karjat sakal
अहिल्यानगर

कर्जतची राजकीय समीकरणे बदलणार

प्रस्तावित गट-गणरचनेमुळे पक्षबदलाचे वारे

नीलेश दिवटे

कर्जत : तालुक्यात एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गणांची भर पडणार आहे. त्यामुळे पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती गण अस्तित्वात येतील. मात्र, चापडगाव गटाची निर्मिती करताना गावांच्या तोडफोडीमुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. एका पक्षाचे तब्बल चार पदाधिकारी दुसरीकडे उडी मारण्याच्या तयारीत आहेत. आरक्षण काय निघणार, याबाबत उत्सुकता आहे. इच्छुक देव पाण्यात बुडवून बसले आहेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडणार आहेत.

नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतील पराभवाचा वचपा राम शिंदे काढणार का, याबाबत उत्सुकता आहे. मागील निवडणुकीवेळी सोबत असलेले अनेक कार्यकर्ते सोडून गेल्याने समीकरणे बदलली आहेत. तालुक्यात सध्या राष्ट्रवादीचे दोन व भाजपचे दोन जिल्हा परिषद सदस्य आहेत. पैकी भाजपच्या एका जिल्हा परिषद सदस्याचे निधन झाले आहे. अंतराने लांब असलेली गावे काही गटांना जोडली गेल्याने, तुलनेत अंतराने कमी आणि नियमित व्यवहार- संपर्क असलेली गावे बाजूला फेकली आहेत. रातंजन हे मिरजगावला जवळ असताना त्याला चापडगाव गटाला, तर चिंचोली काळदात हे गाव कोरेगाव गटाच्या जवळ असताना कुळधरण गटाला जोडले आहे. अशी अनेक गावे पूर्वीच्या गटापासून तुटली आहेत. याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो.

महाविकास आघाडी झाल्यास इच्छुकांची वाढती संख्या डोकेदुखी ठरू शकते. भाजपची सर्व मदार राम शिंदे आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर आहे. नगरपंचायत निवडणुकीत जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी किल्ला लढविला. शिवसेना अजून ॲक्टिव्ह मोडमध्ये आली नाही. मनसेचे अस्तित्व नावालाच आहे.

संभाव्य गट आणि गण

कोरेगाव गट - कोरेगाव गण- बजरंगवाडी, कुंभेफळ, धांडेवाडी, नेटकेवाडी, अळसुंदे, निंबे, बेनवडी, कोळवडी, थेरवडी आणि तोरकडवाडी. शिंदे गण-बिटकेवाडी, माळेवाडी, नांदगाव, वडगाव तनपुरा, रेहेकुरी, वालवड, सुपा, बहिरोबावाडी, पठारवाडी, गोयकरवाडी, खंडाळा, चिंचोली काळदात, कापरेवाडी.

कुळधरण गट- कुळधरण गण-भोसे, चखालेवाडी, रुईगव्हाण, कोपर्डी, सुपेकरवाडी, दूरगाव, राक्षसवाडी (खुर्द आणि बुद्रुक), धालवडी, तळवडी आणि ताजू.बारडगाव सुद्रिक गण- बारडगाव दगडी, येसवडी, बेलवंडी, पिंपळवाडी, जलालपूर, सिद्धटेक, बेर्डी, करमनवाडी, वायसेवाडी आणि आखोणी.राशीन गट- राशीन गण-सोनाळवाडी, कानगुडवाडी, देशमुखवाडी, चिलवडी आणि होलेवाडी. भांबोरा गण- हिंगणगाव, दुधोडी, गणेशवाडी, खेड, औटेवाडी, शिंपोरा, बाभूळगाव दुमाला, मानेवाडी, करपडी, परीटवाडी, काळेवाडी, रावकाळे वाडी.चापडगाव गट- चापडगाव गण-पाटेवाडी, म्हाळंगी, मलठण, लोणी मसदपूर, दिघी, निमगाव डाकू, आंबी जळगाव, जळकेवाडी, नवसरवाडी, खातगाव, शेगूड, डोंबळवाडी, आनंदवाडी आणि हंडाळवाडी.

पाटेगाव गण - माही, जळगाव, बाभूळगाव खालसा, डिकसळ, नागलवाडी, नागापूर, निंबोडी, रातंजन, सीतपूर, टाकळी खंडेश्वरी आणि तरडगाव मिरजगाव गट-मिरजगाव गण-गोंदर्डी, निमगाव गांगर्डा, मांदळी, घुमरी, बेलगाव, कोकणगाव आणि तिखी कोंभळी गण- चिंचोली रमजान, थेरगाव, नागमठाण, खांडवी, रवळगाव, कौडणे, मुळेवाडी, चांदे (बुद्रुक व खुर्द), खुरंगेवाडी, गुरव पिंप्री आणि थेटेवाडी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT