राशीन (अहमदनगर) : उजनीतील पाणी (Ujani Dam) उचलण्यास सोलापूर (solapur आणि पुणे (pune) असा संघर्ष पेटला आहे. करमाळा आणि माढा या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तसेच नेत्यांनी इंदापूरकरांना (Indapur taluka) विरोध केला आहे. त्यात आता कर्जतकरांची भर पडली आहे.
उजनी धरण क्षेत्राच्या फुगवट्यातून 5 टीएमसी पाणी उचलून इंदापूर तालुक्यातील शेतफळ गढे येथील उपसा सिंचन योजनेला देण्यास आता खेडेकरांनीही विरोध दर्शविला आहे. हे पाणी उचलल्यास उजनीच्या फुगवट्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर पाणीबाणीचे संकट उभे राहणार आहे. त्यामुळे हे पाणी उचलण्यास विरोध असल्याचे निवेदन खेडच्या ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले आहे. (Karjatkars oppose taking water from Ujani dam)
निवेदनात म्हटले आहे की, मागील दशकापासून सातत्याने उजनी धरण फुगवटा क्षेत्र कोरडे पडत आहे. अनेकवेळा उजनी धरण शंभर टक्के भरतच नाही. खेड व परिसरातील अनेक गावे भीमा नदीच्या किनाऱ्यावर वसलेली असून, यात अनेक गावे पुनर्वसितही झालेली आहेत.
उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलण्याचा निर्णय झाल्यास येथील हजारो हेक्टर शेतीचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्हाला प्राधान्याने पाणी देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. उद्योजक नीलेश निकम, सोमनाथ वाघमारे यांनी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांना हे निवेदन दिले.
रोहित पवारांनी गांभीर्याने पाहण्याची गरज!
"पाण्याची पळवापळवी झाल्यास कर्जत तालुक्यातील असंख्य शेतकरी उद्ध्वस्त होतील. अनेकवेळा उजनी फुगवट्याच्या गावांना दुष्काळाचा फटका सहन करावा लागतो. पाणी दिल्यास तालुक्यातील बारमाही पाणी योजना हंगामी होतील. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी म्हणून आ. रोहित पवारांनी (rohit pawar) लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. (Karjatkars oppose taking water from Ujani dam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.