करुणा शर्मा sakal
अहिल्यानगर

Nagar : करुणा शर्मा-मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल

भोसले यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : नवीन पक्ष काढण्यासाठी रोख रक्कम व सोन्याच्या स्वरूपात दिलेल्या सुमारे ३४ लाख ४५ हजार रुपयांची परतफेड न केल्याच्या फिर्यादीवरुन करुणा धनंजय मुंडे ऊर्फ करुणा अशोक शर्मा यांच्याविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.३) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, करुणा मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्ते भारत संभाजी भोसले (वय ४०, रा. कोंची, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात २६ ऑगस्ट रोजी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र आपल्यावरील आरोप खोटा असून, आपलीच फसवणूक झाल्याचे सांगत भोसले यांनी २० ऑगस्ट रोजी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे भोसले यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर शनिवारी (ता. तीन) रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, पक्ष काढण्यासाठी व बांधणीकरीता आपण करुणा मुंडे यांना चार लाख रुपये रोख स्वरूपात दिले. त्यानंतर त्यांनी मागितलेल्या ३६ लाख रुपयांच्या पूर्ततेसाठी स्वतःसह मित्र बालम शेख यांचे असे २४ तोळे सोने दिले. पक्षाची नोंदणी होवून पैसे जमा झाल्यानंतर पैसे परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

परंतु करुणा मुंडे

यांनी ४० लाख रुपये पूर्ण जमा न झाल्याने माझ्या ओळखीचे विद्या संतोष अभंग व इतर तिघांच्या नावावर असलेला, बाराशे चौरशे फुटांचा घुलेवाडी येथील बंगला हा पक्षाचे कार्यालय म्हणून दाखविण्यासाठी साठेखत दस्त करुन नोंदवून घेतला व त्यात नऊ लाख १० हजार रुपये अभंग यांना दिल्याचे दाखविले. मात्र ही रक्कम मुंडे यांनी अभंग यांच्याकडून परत घेतली. त्यानंतर करुणा मुंडे यांनी पक्ष नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन न केल्याने, पैशांची मागणी केली. ते परत देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. या प्रकरणी आपण पोलिस अधीक्षकांकडे गेल्याचे समजताच त्यांनी त्यांच्या मोबाईलवर व्हॉईस मेसेजद्वारे मारण्याची धमकी दिली. लगेच थोड्यावेळाने तो व्हॉईस मेसेज डिलिट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निकिता महाले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT