Kashinath Date has said that more and more development works are being done in Parner taluka  
अहिल्यानगर

आमदारांपेक्षा आम्ही जास्त कामं केली; अहमदनगर झेडपी सभापती काशिनाथ दाते

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यात जरी आमची सत्ता नसली तरीही तालुक्यात सत्ताधारी आमदारांपेक्षा आमची सर्वाधिक पटीने विकास कामे सुरू आहेत. आमची जिल्हा परिषद व पंचायत समितीत या दोन्ही ठिकाणी सत्ता आहे.. या सत्तेच्या माध्यामातून तालुक्यात अधिकाधिक विकास कामे करत आहोत व यापुढील काळातही करणार असल्याचे जिल्हापरीषदेचे कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी केले.

रांजणगाव मशीद येथे सुमारे २५ लाखाचे ग्रामसचिवालय, १२ लाख ४८ हजार रूपयांचा बंधारा, १२ लाख रूपयांचा जवक मळा रस्ता डांबरीकरण या कामाचे भूमिपुजन व तीन लाख रूपयांचे जलशुद्धीकरण यंत्राचे उदघाटन रविवारी (ता. २१ ) झाले. अशा प्रकारे सुमारे ५० लाख रूपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपुजनप्रसंगी दाते बोलत होते. अध्यक्षस्थानी गजानन गाढवे होते. प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके होते. या वेळी युवा नेते राहुल शिंदे, सरपंच प्रती साबळे, प्रभाकर देशमुख, उपसरंपच बाबा जवक, प्रियंका शिंदे, अप्पासाहेब देशमुख, बंटी साबळे, कल्याण गाढवे, शरद सरोदे ,संतोष सरोदे, सुधिर खिलारी, भाऊ देशमुख , काका देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

दाते पुढे म्हणाले, कोरोनामुळे गतवर्षी विकास निधी न आल्याने मला पदभार घेतल्यानंतर वर्षभरात कामे करता आली नाही. आता निधी आल्याने तो अनुशेष भरून काढला जाणार आहे. आलेल्या निधीचा पुरेपुर वापर केला जाणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील सुमारे एक हजार शाळा खोल्यांचे निर्लेख मंजूर झाले आहे  व सुमारे साडेचारशे शाळा खोल्यासाठी साठी निधी मिळाला आहे. त्या खोल्या आता होणार आहेत. तसेच जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात दुर्गम व वाड्या वस्त्यांवरील रस्ते व बंधा-यांची कामे या वर्षी करणार आहोत.  

या वेळी शेळके म्हणाले, मला तालुक्यातील जनतेने दुस-यांदा सभापती होण्याची संधी दिली. व दुस-यांदा सभापती करण्यात राहुल शिंदे यांचा मोठा वाटा आहे मी त्यांच्या उपकाराची परत फेड त्यांच्या गावातील विकास कामातून करणार आहे. मी जिल्हा परीषद निवडणूक लढविणार नसल्याने राहुल पामी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. 

या वेळी युवा नेते राहुल शिंदे म्हणाले, आमच्या घराण्याने व मी कधीच स्वर्थासाठी किंवा पदासाठी राजकारण केले नाही. आमचे गाव सुद्धा नेहमी सत्तेच्या विरोधात आहे. मात्र आमच्या गावातील विकास कामात आम्ही कधीच मागे नाही. आमच्या गावात जो विकास कामांसाठी निधी देतो, त्याला आम्ही विसरत नाही. त्याला मताधिक्या दिल्याशिवाय राहात नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT