crime Esakal
अहिल्यानगर

खुंटेफळमध्ये मुलाची गळा चिरून हत्या, गाव हादरले

राहत्या घरातच हत्या झाल्याने पोलिसही अवाक

सचिन सातपुते

शेवगाव : अकरा वर्षीय मुलाच्या मानेवर तिष्ण हत्याराने वार करुन त्याची हत्या झाल्याची घटना खुंटेफळ ता.शेवगाव येथे काल (सोमवार ता.10) सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान घडली. सार्थक अंबादास शेळके (वय-11) असे त्या मुलाचे नाव आहे. राहत्या घरातच हत्या झाल्याने गावामध्ये घबराटीचे वातावरण आहे.(Killing a child by slitting his throat)

या बाबत मुलाचे वडील अंबादास शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेक-यांविरोधात रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेने शेवगाव तालुका हादरला आहे. या मुलाची कोणी व कोणत्या कारणाने हत्या केली, याचा तपास लावण्याचे आव्हान शेवगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

या बाबत समजलेली माहिती अशी की, खुंटेफळ ता.शेवगाव येथील अंबादास शेळके हे सोमवार ता.10 रोजी दुपारी आपल्या कुंटूंबासमवेत घराशेजारी असलेल्या जनावरांच्या गोठयात काम करीत होते. या सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास अंबादास शेळके यांनी मुलगा सार्थक यास घरामध्ये असलेला मोबाईल घेऊन घेण्यास सांगितले.

सार्थक हा घरामध्ये मोबाईल आणण्यासाठी गेला. मात्र बराच वेळ झाला तरी तो का आला नाही. वडील त्याला पाहण्यासाठी घरी गेले असता ते घरामध्ये रक्ताच्या थारोळयात पडलेला दिसला. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार झाल्याने त्यांच्या लक्षात आले.

सार्थक याला तातडीने गावातील संतोष काळे यांच्या मदतीने दुचाकीवरून शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

दरम्यान या घटनेची माहिती कळताच शेवगाव पोलिस ठाण्याचे प्रभाकर पाटील यांनी पथकासह धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी सार्थकचे वडील अंबादास दत्तू शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यात उडाली खळबळ

सार्थक शेळके याच्यावर गावातील स्वतःच्या घरामध्ये असा अचानक हल्ला करून खून झाल्याने या घटनेने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. या खुनाचा तपास लावण्याचे आव्हान शेवगाव पोलीसांसमोर उभे ठाकले आहे.(Killing a child by slitting his throat)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT