Life imprisonment till death for Rape District Sessions Judge sentenced accused crime 
अहिल्यानगर

Ahmednagar News : अत्याचार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप

जिल्हा सत्र न्यायाधिशांनी सुनावली आरोपीस शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या छबू ऊर्फ छबन पांडुरंग आखाडे (वय ५८, रा. चिंचोली काळदात, ता. कर्जत) याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी ठोठावली. ॲड. संगीता ढगे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

छबू ऊर्फ छबन आखाडे याने चिंचोली काळदात परिसरातील एका गावातील घरी, एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीला धमकावून १० जानेवारीला १२ वाजता आणि २६ जानेवारीला सकाळी साडेअकरा वाजता अत्याचार केला.

पीडितेने ही माहिती आईला सांगितली. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात आरोपी छबू ऊर्फ छबन पांडुरंग आखाडे (वय ५८) याच्याविरुद्ध अत्याचाराबद्दल भारतीय दंड विधानाचे कलम ३७६, धमकावल्याबद्दल ५०६ अन्वये, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी छबू याचा मुलगा सुंदर ऊर्फ सुंदरदास आखाडे यानेही मुलीच्या आईला गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले होते. त्यानुसार त्याच्याविरुद्धही धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. छबू आखाडेविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. सुंदरदास आखाडे याची सबळ पुराव्याआधारे मुक्तता केली.

सरकारी वकील संगीता ढगे यांनी कठोर शिक्षा देण्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून, शिक्षा सुनावली. महिला पोलिस आशा खामकर आणि गणेश काळाणे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT