Shrirampur Crime sakal
अहमदनगर

Shrirampur Crime : लिफ्ट घेतली, मैत्री झाली अन् जीवही गमावला,तरुणाच्या खुनाचा श्रीरामपूर पोलिसांनी लावला तपास

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : लिफ्ट घेतल्यानंतर झालेली मैत्री आणि काही वेळात झालेल्या वादानंतर अल्पकाळातील मैत्री थेट जीवावरच उलटली आणि ९० किमीच्या प्रवासात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे नांदूर (ता. राहाता) येथील खुनामागील रहस्य उलगडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.

शुक्रवारी (ता.४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नांदूर येथील तळ्याजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुना होत्या. पोलिसांना त्याच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याची ओळख पटली. मयत नितेश आदिनाथ मैलारे (रा. पोखंडेवाडी, ता. मुखेड, जि. नांदेड) असल्याचे समोर आले.

शेवटचा काॅल आईला केल्याचे पुढे आले. मात्र, त्याचा श्रीरामपुरात मृतदेह सापडल्याने त्याचा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला त्याचा शोध पोलिस घेत होते. पोलिसांनी सदरचा गुन्हा ॲपेचालक ऋषिकेश देवण्ण्या बरबट (वय २५, रा. केलवड, ता. राहाता) याने केल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी बरबट याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.

मयत मैलारे हा छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होता. त्याला आपल्या ॲपे रिक्षात लिफ्ट दिली. या प्रवासात दोघांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. याचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघे रस्त्यात एकत्र दारू पिले. यादरम्यान त्यांच्यात जुनी मैत्र असल्यागत संभाषण झाले. पुढे आल्यावर नेवासेजवळ पुन्हा ते दोघे एका हॉटेलला थांबले. पुन्हा दारू पिले. श्रीरामपूरजवळ आल्यानंतर त्या दोघांमध्ये खटका उडाला.

त्यातून वाद विकोपाला गेला. राग अनावर झाल्याने बरबट याने गाडीतील टामी काढून मैलारे याला मारली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तसेच रिक्षातून गंभीर जखमी अवस्थेत बरबट याने ढकलून दिले. अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी कोणताही पुरावा नसताना शिताफीने तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

Haryana Result: दलित पाठीशी, ओबीसींची खंबीर साथ, मतदारांचा भाजपच्या डोक्यावर हात! हरियानाचं मैदान कसं जिंकलं?

मूळ लड्डू मुत्या बाबा कोण होते? Instagram वर व्हायरल झालेला बाबा खरा की खोटा? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Israel–Hamas war: इस्राईलच्या हल्ल्यात हिज्बुल्लाचा कमांडर सुहैल हुसेन हुसैनी ठार; शस्त्रपुरवठा विस्कळीत होण्याचा धोका

Suryakumar Yadav: 'मला फक्त पेपरवर कॅप्टन व्हायचं नाहीये, तर...' सूर्याचं टी२० नेतृत्वाबाबत मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT