Nitesh Rane sakal
अहिल्यानगर

Nitesh Rane : धर्मांतराचे प्रकार खपवून घेणार नाही - नीतेश राणे

नीतेश राणे ः राहुरीत हिंदू जनआक्रोश मोर्चाला विराट गर्दी

विलास कुलकर्णी

राहुरी : देशात व राज्यात हिंदूत्ववादी सरकार आहे. हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. धर्मांतराचे प्रकार खपवून घेणार नाही. राज्यात महिला भगिनी सुरक्षित आहेत. हिंदुत्ववादी समाज व कार्यकर्ते एकटे नाहीत. त्यांच्यावर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करू नयेत. अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा सज्जड इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला.

राहुरी येथे आज हिंदू जनआक्रोश मोर्चानंतर सभेत ते बोलत होते. या मोर्चात तालुक्यासह जिल्ह्यातून विविध संघटना व पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाल्याने मोर्चाला विराट गर्दी झाली होती. या प्रसंगी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग, एकलव्य आदिवासी संघटनेचे योगेश सूर्यवंशी, हर्षदा ठाकूर, तुकाराम महाराज यांचे वंशज मोरे महाराज, आदिनाथ महाराज दुशिंग, प्रसाद बनकर यांची भाषणे झाली.

राणे म्हणाले, की उंबरे येथील अल्पवयीन मुलींच्या धर्मांतर प्रकरणात योग्य कारवाईची अपेक्षा होती. परंतु, मुलींना वाचवणाऱ्यांवर खोट्या केसेस केल्या. त्यांना अटक करून धमक्या दिल्या. पोलिस खात्यातील काही सडके आंबे सरकार व पोलिस दलाचे नाव खराब करीत आहेत. आमच्या समाजाच्या मुलींचे धर्मांतर होण्यापासून त्यांना आम्ही वाचवायचे नाही काय?

घुसलेले पाकिस्तानी, बांगलादेशी, रोहिंगे शोधून त्यांना ‘एटीएस’च्या माध्यमातून राज्यातून हकलण्याचे काम सुरू आहे. भारतीय घटनेचे हिंदू समाज पालन करतो. आमच्या सणांना प्रदूषणाचे नियम असतात.

दिवाळीत फटाके, होळी, दसरा, गणपती उत्सवात मिरवणुकांवर नियम, रात्री दहापर्यंतची बंधने लादली जातात. त्यांचे दिवसातून पाच वेळा मोठ्या आवाजात भोंगे वाजतात. त्यांना प्रदूषणाचे नियम नाहीत का? आम्हाला हिंदू म्हणून जगू द्या. आम्हाला आडवे आलात, तर दोन पायावर घरी जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

यांचा सहभाग

या मोर्चात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

दोन तास सभा

‘वायएमसीए’ मैदानातून सकाळी साडेअकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चानंतरची सभा दुपारी दोन वाजता संपली. सभेत दोनदा पावसाने हजेरी लावली. विराट जनसमुदाय भर पावसात चिखलात बसला. महिलांची संख्याही लक्षणीय होती. सभेच्या ठिकाणी जागा अपुरी पडल्याने आसपासच्या इमारतींवर बसून हजारोंच्या जनसमुदायाने भाषणे ऐकली.

दुपारी चारनंतर वाहतूक सुरळीत

तीन ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होती. मोर्चामुळे रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने वाहने उभी होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली. विविध संघटनांतर्फे नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

सर्व व्यवहार ठप्प

राहुरी शहरात जनआक्रोश मोर्चाचे फ्लेक्स जागोजागी झळकत होते. मोर्चामुळे शहरातील सर्व दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले होते. या मोर्चामुळे बाजारपेठ बंद होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT