राहुरी विद्यापीठ (अहमदनगर) : दहा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये यापूर्वी क्रीडाभवन होते, मात्र तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे, अनेक वर्षापासून डागडुजी स्वच्छता नसल्यामुळे या परिसरामध्ये लोकांची वहिवाट कमी झाली होती. (Mahatma Phule Agricultural University Sports Building has been renovated)
विद्यापीठाची मानाची असलेली इमारत म्हणून या जिमखाना इमारतीकडे एकेकाळी पाहिले जात होते. अनेक विद्यार्थी याच ठिकाणी मैदानी खेळ व सरावामुळे राज्याच्या पोलिस दलामध्ये आपले नाव गाजवत आहेत. यापूर्वी याच परिसरामध्ये कृषी तंत्रज्ञान सप्ताह तसेच किसान आधार संमेलन भरविण्यात आले होते. येथील मोठ्या पटांगणावर २०१४ मध्ये विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर जिल्ह्याचे तसेच देशातील राजकारण बदलले होते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले गवत, ढासळत चाललेली इमारत, जंगलसदृश्य झाडे व झुडुपे वाढलेल्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सापांचा वावर अशी ओळख क्रीडा भवनाची बनलेली होती. अशा अनेक बाबींमुळे परिसरातील विद्यार्थी व नागरिक क्रीडाभवनापासून दुरावले होते.
एक सुशोभित क्रीडाभवन असणे ही संस्थेची जमेची व मानाची बाजू असते, या अनुषंगाने विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी रुजू झाल्यापासून स्वच्छतेचा झपाटा लावला, सर्व अनावश्यक वाढलेले गवत, परिसरात झालेली अस्वच्छता दूर केली. विद्यापीठाच्या या अधिकाऱ्यांनी परिसरातील झाडांच्या खाली आलेल्या फांद्यांची छाटणी करून, गवताची काढणी तसेच रंगरंगोटी करून आता जिमखाना परिसर अत्यंत आकर्षक बनविला आहे, यामुळे विद्यापीठातील रहिवासी तसेच विद्यार्थी क्रीडाभवनाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षिले गेले असून या परिसरामध्ये मॉर्निंग वॉक, ईव्हीनिंग वॉक करणार्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. लवकरच मोठ्या पटांगणासह असलेल्या या क्रीडाभवनाच्या हा परिसरामध्ये विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थोडेफार मनावर घेतल्यास आकर्षक स्टेडियमसह जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नक्कीच आयोजित होऊ शकतील व पूर्वीचे वैभव क्रिडाभवनास पुन्हा प्राप्त होईल यात शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.