mahatma phule agriculture university sakal
अहिल्यानगर

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे दहा नवीन वाणांना मान्यता

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे दहा वाण, एक कृषियंत्रे अवजारे आणि ५८ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे दहा वाण, एक कृषियंत्रे अवजारे आणि ५८ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली.

राहुरी विद्यापीठ - महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठे (agriculture university) यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी येथे कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत (Meeting) संपन्न झाली.

या बैठकीस अध्यक्षस्थानी कृषिमंत्री ना. दादा भुसे, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विद्यापीठांचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, डॉ. व्ही.एम. भाले, डॉ. अशोक ढवण, डॉ. संजय सावंत आणि परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने ऑनलाईन उपस्थित होते.

या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे दहा वाण, एक कृषियंत्रे अवजारे आणि ५८ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. कृषी क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानामध्ये प्रथमच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तीन शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या आहेत. विविध पिकातील प्रसारित केलेल्या वाणामध्ये ज्वारी-फुले यशोमती, गहू-(फुले अनुपम) एन.आय.ए.डब्ल्यू ३६२४, सोयाबीन-फुले दुर्वा, उडीद-फुले वसू, तीळ-फुले पुर्णा, ऊस-फुले ११०८२, करडई-एस.एस.एफ १५-६५, एस.एस.एफ १६-०२, पेरु-फुले अमृत, चिंच-फुले श्रावणी हे वाण प्रसारीत करण्यात आले. तसेच ट्रॅक्टरचलीत फुले ऑटोमॅटीक पलटी नांगर यंत्र व ५८ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारीत करण्यात आल्या असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT