karjat nagarparishad  sakal
अहिल्यानगर

कर्जत नगरपरिषदेदत महिलाराज; नगराध्यक्षपद आरक्षण सोडत

अकोले, पारनेर सर्वसाधारण

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : कर्जत, अकोले आणि पारनेरच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या तिन्ही नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आज (गुरुवार) मुंबई येथे नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. कर्जतमध्ये महिलाराज, अकोल्यात, तसेच पारनेरमध्ये सर्वसाधारण व्यक्तीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

या तिन्ही नगरपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले होते. आमदार रोहित पवार यांनी कर्जतमध्ये एकहाती सत्ता आणली आहे. अकोल्यात माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपला पुन्हा विजय मिळवून दिला आहे, तर पारनेरमध्ये त्रिशंकू स्थिती होती तरी निकालानंतर आमदार नीलेश लंके यांनी अपक्षांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.कर्जत : कर्जत नगरपंचायतीवर पुन्हा महिलाराज येणार असून, आज निघालेल्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीत सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निघाले आहे. यामुळे कोणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची सोडत नगरविकास विभागाच्या वतीने मुंबई येथे आज काढण्यात आली. त्यात कर्जतचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी निघाले आहे. या नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सतरापैकी पंधरा जागा जिंकल्या आहेत, तर विरोधी माजी मंत्री राम शिंदे नेतृत्वाखालील भाजप मित्रपक्षांना केवळ दोन जागांवरच समाधान मानावे लागले.

अकोले नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर झाली असून, पद सर्वसाधारण वर्गासाठी खुले आहे. अकोले नगरपंचायतीत १७ पैकी भाजपला १२, राष्ट्रवादी दोन, शिवसेना दोन, तसेच काँग्रेसला एक जागा मिळाली. नगरपंचायतीत भाजपच्या वतीने गटनेते म्हणून बाळासाहेब वडजे यांची निवड झाली आहे. आता नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे लक्ष लागले आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांचा शब्द अंतिम असेल, अशी तालुक्यात चर्चा आहे. नगरपंचायतीत निवडून आलेल्या महिलांची संख्या नऊ आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, प्रतिभा मनकर, माधुरी शेणकर यांचीही नावे चर्चेत आहेत.

या जागेवर आता सर्वच नगरसेवकांना हक्क सांगता येणार आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्रिशंकू अवस्था झाली होती. मात्र, निकालानंतर राजकीय खेळी करत आमदार नीलेश लंके यांनी शहरविकास आघाडीचे दोन व एक अपक्ष, अशा तीन नगरसेवकांना जुळवले. इतकेच नव्हे, तर त्यांचा थेट पक्षातच प्रवेशही घडवून आणला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ दहा झाले आहे. आता नगराध्यक्ष कोण होणार, याकडे शहरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे. नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला दहा, शिवसेनेला सहा व भाजपला एक जागा मिळाली आहे. राष्ट्रवादीकडून गटनेते म्हणून विजय सदाशिव औटी व उपगटनेते म्हणून सुरेखा भालेकर यांची निवड करण्यात आली आहे.

  1. कर्जतमध्ये ११ महिला नगरसेवक

  2. राष्ट्रवादी काँग्रेस- १२, पैकी सात महिला

  3. काँग्रेस- तीन, पैकी दोन महिला

  4. भाजप- दोन, दोन्ही महिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT