अहमदनगर : मराठा आरक्षणावरून सुरु असलेलं छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात दररोजच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात आता जरांगेंच्या एका दाव्यानं खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना हे वक्तव्य केलं आहे. (Maratha Reservation Chhagan Bhujbal on the way to BJP claim of Manoj Jarange political atmosphere will heat up)
"छगन भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची आहे," असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांच्या या राजकीय वक्तव्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नेवासा शहरात थोड्याच वेळात मनोज जरांगेंची जाहीर सभा होणार आहे. मात्र, सभेआधीच मनोज जरांगे यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीनं सभास्थळी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रामेश्वर घोंगडे असं या व्यक्तीचं नाव असून ते धनगर समाजाचे आहेत. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी ते नेवासेत आले आहेत. मराठा आणि धनगरांना आरक्षण मिळेपर्यंत जरांगेंनी लढा सुरूच ठेवावा, अशी मागणी देखील जरांगे करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.