अहमदनगर

Maratha Reservation: मी असो नसो, आंदोलन सुरूच ठेवा! मनोज जरांगेंची साद, सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या

सकाळ डिजिटल टीम

Manoj Jarange Maratha Reservation: ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांना अगोदर कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यानंतर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र मिळायलाच हवे. ‘सरसकट आरक्षणावर’ आम्ही ठाम आहोत, मी असो वा नसो, आंदोलन सुरूच ठेवा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी अहमदनगरमध्ये सभेत केले.

लाखो मराठ्यांसह पायी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे रविवारी रात्री (ता.२१) अहमदनगरमध्ये (बाराबाभळी) जंगी स्वागत करण्यात आले. बाराबाभळी येथील मदरसाच्या दिडशे एकर मैदानावर आंदोलकांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली होती. जरांगे यांंचे रात्री साडेबाराच्या सुमारास मैदानावर आगमन झाले.

फटाक्यांची आतषबाजी, तसेच जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत जरांगे पाटलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, की मराठ्यांना मानावे लागेल. मोठ्या संख्येने मराठा समाज एक झाला आहे. मराठा कधी एक होत नाहीत, असा टोमणा मारला जात होता. पण मराठा एक झाला आणि त्याने ओबीसीतून आरक्षणही घेतले आहे. मराठा एक होऊ नये, यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले होते. पण पाठबळ कसे उभे करायचे हे मराठ्यांनी दाखवून दिले आहे. ही एकजूच तुटू देऊ नका, असे आवाहन जरांगे यांनी केले. मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हीच सरकारची मोठी अडचण आहे. सात महिन्यांचा वेळ दिला, तरी निर्णय नाही.

सरकारने काही दगाफटका केला तरी हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आतापर्यंत ५४ लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र द्या व सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली.

मराठा ओबीसीत गेले

जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना चांगलेच चिमटे घेतले. भुजबळांचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध आहे. त्यावर जरांगे म्हणाले, की ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक घरातील पाच जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल, म्हणजेच सुमारे अडीच कोटी मराठे आता ओबीसीत जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

जगताप यांच्याकडून स्वागत

जरांगे पाटील यांचे नगर शहरात जागोजागी भव्य स्वागत करण्यात आले. उड्डाणपुलाच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. माळीवाडा बसस्थानक येथे जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे स्वागत केले.

नोंदी सापडल्याची यादी लावा

आता सोपं आहे, नोंदी सापडल्या फक्त प्रमाणपत्र देण्याची गरज आहे. वंशावळ जोडण्याचीही गरज नाही. दोन दिवसात देखील प्रमाणपत्र देता येतील. ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांची यादी ग्रामपंचायतीमध्ये लावा. शिबिर घेऊन लगेच प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mega Block : रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे मुंब्रा, दिवा, कोपर वासियांचे मेगा हाल

Sharad Pawar : यशवंतराव चव्हाणांसोबतचे 5 दशकापूर्वीचे छायाचित्र पाहून पवारांना झाला आनंद

Ajit Pawar : येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे वीज 'Zero Bill' करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

Arvind Kejriwa : केजरीवालांनी मोहन भागवातांना विचारले 'हे' पाच अवघड प्रश्न; मोदींच्या निवृत्तीबद्दलही मागितला खुलासा

Khambatki Ghat Accident : खंबाटकी घाटात भीषण अपघात! ब्रेकफेल झालेल्या कंटेनरने सात गाडयांना उडवले: तिघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT