milk price down Animal feed prices increased fodder prices cattle crisis ahmednagar esakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : दुधाच्या दरात मोठी घसरण; पशुखाद्याचे दर वाढले, चाऱ्याचे भाव गगनाला, पशुपालक संकटात

दूध व्यवसाय अडचणीत सापडला असून, सध्या हिरव्या चाऱ्याचे भाव वाढलेले आहेत, तर दुधाचे दर कमी झालेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शहरटाकळी : शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. असे असताना आता हा व्यवसाय करणे अवघड झाले आहे. दूध दरात मोठी घसरण झाली असून, ४० रुपयांपर्यंत गेलेले दर आता ३१ रुपयांवर आले आहेत. तर दुसरीकडे चाऱ्याचे व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. दुधाळ जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना आता अवघड जात आहे.

दूध व्यवसाय अडचणीत सापडला असून, सध्या हिरव्या चाऱ्याचे भाव वाढलेले आहेत, तर दुधाचे दर कमी झालेले आहेत. शहरटाकळी परिसरात सद्य:स्थितीत मका व उसाचा हिरवा चारा दोन ते तीन हजार रुपये टन या दराने परिसरात मिळत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गायी, म्हशी घेऊन दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे काही कुटुंबांचा उदारनिर्वाह दूध व्यवसायावर चालतो.

मात्र, सध्या चारा दर गगनाला भिडल्याने पशुधन सांभाळणे मोठे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे दूध व्यवसायाला घरघर लागली आहे. पशुखाद्यात दरवाढ झाली आहे, तर दुधाचे दर कमी झाल्यामुळे पशुपालकांवर दुहेरी संकट आले आहे.

शेतकरी पशुपालन व्यवसाय वाढविण्याच्या तयारीत होते. गेल्यावर्षी काही शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरे खरेदी केली. त्यासाठी जवळचे पैसे खर्च केले, तर काहींनी बँकेचे कर्ज व उसनवारीने पैसे घेऊन गायी, म्हशी खरेदी केल्या होत्या.

मात्र, त्यामुळे जनावरे विकताही येईनात आणि ठेवताही येईनात, अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी हैराण झाले आहेत. आता दुधाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाकडे पाहिले जाते. असे असताना आता हा व्यवसाय करणे अवघड झाले आहे. आता दूध दरात मोठी घसरण झाली असून, ४० रुपयांपर्यंत गेलेले दर ३१ रुपयांवर आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत.

- संतोष वाघ, दूध उत्पादक शेतकरी, मठाचीवाडी

कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ, मजुरीची दरवाढ, ट्रान्सपोर्ट खर्च या सर्वांचा ताळमेळ घालून जिनिंग मालक दर ठरवतात. मिळेल त्या दरात पशुखाद्य खरेदी केले जाते. आलेल्या मालाची वजाबाकी करून दोन टक्के नफा मिळेल, या दराने पशुखाद्य विकावे लागते.

- बबन जगदाळे, पशुखाद्य विक्रेते, मठाचीवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT