MLA Babanrao Pachpute Sakal
अहिल्यानगर

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी : बबनराव पाचपुते

सकाळ डिजिटल टीम

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : एसटी कर्मचाऱ्यांच्या दररोजच्या आत्महत्येच्या बातम्या ऐकून मनाला अत्यंत वेदना होतात. परिवहन महामंडळाचे कर्मचारीही माणसेच आहेत. मात्र, निगरगट्ट सरकारला त्यांचे घेणेदेणे नाही. त्यांना आर्यन खान महत्वाचा वाटतो, असा आरोप करीत आमदार बबनराव पाचपुते यांनी आम्ही मात्र एसटी कर्मचाऱ्यांसोबत असल्याचे सांगितले.

पत्रकात पाचपुते म्हणाले, की २८ ऑक्टोबर रोजी एसटी महामंडळ कर्मचारी संघटनांनी जे आंदोलन केले होते त्यात जो काही निर्णय झाला तो सर्व कामगारांना अमान्य आहे. त्यांची प्रमुख मागणी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची आहे. परंतु, त्याविषयी कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून संघटना विरहीत बेमुदत कामबंद आंदोलन व उपोषण करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाला श्रीगोंदे भाजपतर्फे पाठिंबा देण्यात आला.

पाचपुते म्हणाले की, या निगरगट्ट व अकार्यक्षम सरकारला सर्वसामान्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसुन संपूर्ण महाआघाडी सरकार आर्यन खानला वाचवण्याच्या कामात गुंतले आहे. सरकारने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा गांभिर्याने विचार न केल्यास भाजपाच्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी संपुर्ण राज्यभर आंदोलन उभे केले जाईल. तालुकाध्यक्ष संदिप नागवडे, शहराध्यक्ष राजेंद्र उकांडे यांनी आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे पत्र वाहतुक अधिक्षक स्वप्निल आहेर यांच्याकडे दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT