राळेगणसिद्धी (जि.अहमदनगर) : पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे (tehsildar jyoti deore audio clip viral) यांची ऑडिओ क्लिप शुक्रवारी (ता.२०) सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे तालुक्यासह राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यात पारनेरचे आमदार निलेश लंके व महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके (mla nilesh lanke) यांनी आज सकाळी राळेगणसिद्धी येथे येत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (anna hajare) यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास १ तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. नेमकी काय झाली चर्चा?
नेमकी दोघांमध्ये काय झाली चर्चा?
यावेळी आमदार लंके यांनी हजारे यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांना सादर केलेल्या अहवालाची प्रत दाखवत सविस्तर चर्चा केली. तहसिलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यात काम करत असताना सामान्य जनतेची पिळवणूक करत कसा भ्रष्टाचार केला याचीही माहिती दिली. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये तहसिलदार म्हणून काम करताना त्यांचे काम कसे होते याबाबतची माहिती लंके यांनी यावेळी हजारे यांना दिली. तहसिलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यासबंधीच्या बातमी टीव्हीवर पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी बोललो आहे. अशा गोष्टींमुळे तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे असे अधिकारी तालुक्याला नको आहेत. वेळ पडली तरी मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करील असेही हजारे यावेळी म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, माजी सरपंच जयसिंग मापारी, निलेश लंके प्रतिष्ठानचे कारभारी पोटघन, दत्ता आवरी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.