jyoti deore and nilesh lanke esakal
अहिल्यानगर

ज्योती देवरे Audio clip व्हायरल : आ.लंकेंचे video तून आरोप

तहसीलदार ज्योती देवरे ऑडिओ क्लिप व्हायरल : आ. निलेश लंकेंचे video तून आरोप

मुरलीधर कराळे

पारनेर (जि.अहमदनगर) : लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) यांची, आत्महत्येचा विचार मनात येतो, अशा आशयाची ऑडिओ क्लिप (audio clip viral) व्हायरल झाली आहे. या आरोपाबाबत आमदार निलेश लंके यांनीही एका व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण देत देवरे यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित महिला तहसीलदारांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. तहसीलदार देवरे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व त्यानंतर आमदार लंके यांच्या व्हिडिओद्वारे झालेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्यातील प्रशासन व राजकीय क्षेत्र हादरले आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात या क्लिपबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

लंके यांचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण

आमदार लंके यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे, की तहसीलदार ज्योती देवरे यांची दोन दिवसांपासून ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यांनी केलेला हा केविलवाणा प्रयोग आहे. त्यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी मुंबईला पाठविला आहे. याआधीही त्यांनी असे बरेच प्रयोग केले आहेत. त्यांच्याविषयी भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या. त्यानुसार मी त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे, तर त्यांनी रात्री-अपरात्री मला मेसेज पाठवून, ‘जर तुम्ही या गोष्टी उघड केल्या, तर मी आत्महत्या करीन', असे त्यामध्ये म्हटले होते. त्या वरिष्ठ अधिकारी व आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही दोष देतात. आपणच केवळ चांगले काम करतो, असे त्या दाखवतात. दरम्यान, या वादाबाबत आमदार लंके व तहसीलदार देवरे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

देवरेंचे ऑडिओ क्लिपद्वारे आरोप

देवरे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. तीत त्यांनी लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नाही. आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून क्लिपमध्ये त्या म्हणतात, की मी लवकरच तुझ्या वाटेने सोबतीला येत आहे. एक महिला अधिकाऱ्याचा प्रशासनात कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात, तसेच वरिष्ठसुद्धा त्यांना कसे पाठीशी घालतात, याचाही उल्लेख क्लिपमध्ये केला आहे.

त्या म्हणतात, की पारनेर ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणावरून लोकप्रतिनिधींनी एका आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. नंतर ती तक्रार मागे घ्यायला लावण्यात आले. तसेच, आपल्या विरोधात विधिमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या वाहनचालकाकडून लिहून घेणे, ॲट्रॉसिटीची धमकी देणे, असे अनेक प्रकार माझ्याबाबत घडले आहेत. त्यामुळे आत्महत्येचाच मार्ग दिसत आहे. तत्त्वांना मुरड घालून हुजरेगिरी करत तळवे चाटता येत नाहीत. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही. वरिष्ठांना सांगूनही उपयोग होत नाही. लोकप्रतिनिधी व आपण एका रथाची दोन चाके आहोत, मात्र आपल्या चाकाने जरा गती घेतली, की आपला घात निश्चित समजावा, अशी व्यथा त्यांनी क्लिपमध्ये मांडली आहे.

संबंधित ऑडिओ क्लिप पोलिस प्रशासनाकडे सोपविण्यात येणार आहे. त्यातील सत्यता पडताळून योग्य ती कार्यवाही होईल. - डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

देवरे यांनी केलेले आरोप गंभीर ः फडणवीस

नगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यांनी आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिपसुद्धा जारी केली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी आणि त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रात त्यांनी म्हटले आहे, की लसीकरणावरून काही कर्मचाऱ्यांना पोलिस अधिकाऱ्यांसमोर मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे, महिला कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर तहसीलदार देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त होणे, कोरोना संकटात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकार्‍यांचे खच्चीकरण करणे, असे अनेक गंभीर आरोप संबंधित अधिकाऱ्याने केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT