पारनेर : आमदार नीलेश लंके यांचा साधेपणा समस्त राज्यातील जनतेला परिचित आहे. आमदार निवासात लंके जमिनीवर तर कार्यकर्ते पलंगावर झोपल्याचे दृश्य एका कार्यकर्त्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात बंदिस्त केले. सर्वसामान्य कुटुंबातील आमदार म्हणजेच नीलेश लंके होय. 24 तास 365 दिवस सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारे आ. लंके यांचा सामाजिक पिंड आहे.
राजकारणापेक्षा समाजकारण म्हणून हे नाव पुढे आले आहे. गोरगरीबांच्या कल्याणार्थ झटणारे आमदार नीलेश लंके यांनी प्रस्थापितांना धक्का देत इतिहास घडवला. त्यांच्या रूपाने सर्वसामान्य कुटुंबातील तरुण विधानसभेत पोहचला. गेल्या वर्षभरापासून आमदार म्हणून त्यांनी अनेक कामे केली. कोरोना काळात परप्रांतातील अडकलेल्या मजुरांना मदतीचा हात दिला.
आज राज्यभरातून अनेक जण विविध कामांसाठी आ.लंके यांना फोन केला जातो. सर्वत्र त्यांची लोकप्रियता वाढली आहे. आर. आर. पाटील यांच्यानंतर सर्वसामान्य कुटुंबातील आमदार म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या आमदार निवासात सर्वांना राहण्याची मुभा दिली जाते. त्यामुळे त्यांच्या निवासात सातत्याने गर्दी असते.
बुधवारी कॅबिनेटची बैठक असल्याने आमदार नीलेश लंके मंगळवारी पहाटे ४ वाजता मुंबईतील आपल्या आमदार निवासात पोहोचले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून आलेले कार्यकर्ते झोपले होते. त्यांना त्यांनी उठावले नाही. कार्यकर्त्यांची झोपमोड न करता. एका कोपर्याला असलेल्या जागेत ते झोपले. आणि कार्यकर्ते पलगांवरील गादीवर झोपले. एका कार्यकर्त्याने न राहवून आपल्या मोबाईलमध्ये ते दृश्य टिपले. आज सकाळी सात वाजताचा हा किस्सा आहे. शिक्षक नेते बाळासाहेब खिलारी, दत्ता आवारी, संभाजी वाळुंज, दादा दळवी हेही त्यांच्या समवेत होते.
साधी राहणी अधिक भावणारी
आमदार लंके यांची अत्यंत साधी राहणी सर्व सामान्यांना अधिक भावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांना ही त्यांच्या राहणीने आपलेसे केले आहे. कोणताही बडेजाव पणा न करता सर्वसामान्यांमध्ये वावरणारा आमदार म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे.
या पूर्वीही असाच किस्सा घडला होता.
आमदार नीलेश लंके जमिनीवर आणि कार्यकर्ते गादीवर हे दृश्य या अगोदरही प्रसारमाध्यमांमध्ये गाजले होते. वृत्तवाहिन्यांनी पारनेर नगरच्या आमदारांच्या साधेपणाची दखल घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.