mla ram shinde declared contesting in upcoming lok sabha election mp sujay vikhe Ahmednagar political news  
अहिल्यानगर

Ahmednagar Politics : सुजय विखेंची जागा धोक्यात? खासदारकीसाठी राम शिंदे इच्छूक; केली मोठी घोषणा

रोहित कणसे

राज्यातील राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ते भाजपमध्ये दाखल होणार याची चर्चा सुरू असतानाच अहमदनगरचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

राम शिंदे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शिंदे यांनी ही इच्छा व्यक्त केल्याने अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

राम शिंदे काय म्हणाले?

डॉ. सुजय विखे पाटलां निवडूण आणण्यासाठी पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. तेव्हा ती पार पाडली.दुसऱ्यांदा देखील मी नकार दिला होता. परंतु २०२४ च्या निवडणूकीत मी विधानसभा लढवणार आहे. पण मनाची तयारी ठेवली आहे की परिस्थिती आली तर लोकसभा देखील लढवायची. पक्षाचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता असल्याने आता यावेळी एक वर्षभराच्या तयारीनीशी लोकसभा लढवण्यासाठी देखील तयार आहे असे राम शिंदे म्हणाले आहेत.

भाजपने मला पूर्वी राज्यसभेवर पाठविण्याची तयारी केली होती. मात्र, पुढे काही कारणामुळे ते राहून गेले. त्यानंतर २०१४ मध्ये मी लोकसभेसाठी इच्छूक होतो. तेव्हाही उमेदवारी मिळाली नाही. आता २०२४ ला मी तयारीशी उतरणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान शिंदे यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगीतल्याने मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. राम शिंदेंच्या या घोषणेमुळे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांची जागा धोक्यात येणार का? हा प्रश्न देखील विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT