अहमदनगर : धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करून देण्यासाठी गठित जिल्हास्तरीय समितीवर आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे व इतर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
याबाबतचा शासन निर्णय विधी व न्याय विभागाने जारी केला आहे. धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित खाटा पारदर्शी पध्दतीने निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या मदत कक्षास सहाय्य करण्यासाठी विधी व न्याय विभागाच्या शासन निर्णयान्वये स्थापन जिल्हास्तरीय समिती पुनर्गठित करण्यात आली. या समितीवर जिल्ह्यातील विधानसभा, विधान परिषद सदस्य, वैद्यकीय क्षेत्रातील एक समाजसेवक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती मंत्री विधी व न्याय यांच्या मान्यतेने करण्याची तरतूद करण्यात आली. आमदार शिंदे, आमदार राजळे, गिरीश कुलकर्णी, डॉ. अशोक इथापे, डॉ. सुहास घुले यांचीही निवड करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.