अहिल्यानगर

पवारांची लेक सायकल चालवते नेक! बाबांकडे धरला होता हट्ट

सकाऴ वृत्तसेवा

स्वतः आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून लेकीचं कौतुक केलं आहे. सोबत सायकल शिकवतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे.

अहमदनगर : मुलं गरिबाघरची असो नाही तर श्रीमंताघरची, त्यांचे हट्ट कमी-अधिक प्रमाणात सारखेच असतात. बाबाने आपल्यासोबत खेळलं पाहिजे. गिफ्टसाठी हट्ट केला तर तो पुरवलं पाहिजे, असंच कोणत्याही घरातील बच्चे कंपनीला वाटतं. काही बाबांना मुलांसाठी ठरवूनही वेळ काढता येत नाही. ड्युटी, बिझनेस, परिस्थिती अशी अनेक कारणं त्यासाठी आडवी असतात. काहीजण यात सुवर्णमध्य साधून मुलांचं समाधान करतात. (MLA Rohit pawar has shared a video of his daughter anandita being taught to ride a bicycle)

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांच्या (MLA Rohit pawar) घरातही हेच घडलं. त्यांच्या लेकीने सायकल (ride a bicycle) शिकवण्याचा हट्ट धरला. कामाच्या व्यापामुळे त्यांना वेळ काढता येत नव्हता. सध्या कोरोनाचा काळ असल्याने त्यांचा बराचसा वेळ कोविड सेंटरमधील रूग्णांची काळजी, सोयीसुविधांसाठी तसेच मतदारसंघातील कामांमध्येच जातो. काल त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने त्यांनी आवर्जून वेळ काढला. तो दिवस त्यांनी पत्नी कुंती, मुलगी आनंदिता आणि मुलगा शिवांशसोबत घालवला.

मुलगी आनंदिता (daughter anandita) बाबांकडे नेहमी सायकल चालवायला शिकवण्यासाठी हट्ट करायची. बाबांना वेळ मिळत नसल्याने तो प्लॅन पुढे ढकलावा लागत होता. लग्नाच्या वाढदिवशी वेळ काढून मुलीला सायकल शिकवली. एकाच दिवसात ती चांगल्या प्रकारे सायकल चालवू लागली. आताची पिढी स्मार्ट आहे.

याबाबत स्वतः रोहित पवार यांनी ट्विट करून लेकीचं कौतुक केलं आहे. सोबत सायकल शिकवतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे.

रोहित पवार यांचेही इतरही राजकीय नेत्यांप्रमाणेच शेड्युल बिझी असते. परंतु त्यातूनही ते मुलांसाठी आवर्जून वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. अधिवेशन संपलं की किंवा इतर कामं आटोपली की मुलांना खेळणी घेण्यासाठी दुकानात जातात. आपल्यासोबत इतर सहकाऱ्यांनाही घेऊन जातात. त्याचीही माहिती ते देत असतात.

मुलगी आनंदिताने लग्नाच्या वाढदिवशी आम्हा दोघांना छान गिफ्ट दिलं. तिने स्वतः स्केच केलेले पेटिंग दिले. हे माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. त्या पेटिंगसह रोहित पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट शेअर केली आहे.(MLA rohit pawar has shared a video of his daughter anandita being taught to ride a bicycle)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT