MLA Sangram Jagtap brought the Honey Trap case to the notice of the Home Minister 
अहिल्यानगर

आमदार संग्राम जगताप यांनी गृहमंत्र्यांच्या कानावर घातले हनी ट्रॅप प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः "महिलांच्या माध्यमातून प्रतिष्ठित व्यक्तींची फसवणूक करायची. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल करायची, असा उद्योग करणारी टोळी नगरमध्ये कार्यरत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब असून, या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः लक्ष घालावे,' असे साकडे आमदार संग्राम जगताप यांनी घातले आहे. 

जगताप यांनी गृहमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केली असून, नगरमधील बहुचर्चित "हनी ट्रॅप' प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांना दिली आहे. बहुचर्चित "हनी ट्रॅप' प्रकरणाच्या माध्यमातून अनेक जणांची कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचे पुढे येत आहे. त्याबाबत "सकाळ'च्या माध्यमातून पर्दाफाश करण्याचे सुरू असलेले काम प्रशंसनीय आहे. तथापि, पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतलेली आहे, असा आरोप जगताप यांनी केला.

टोळीकडून फसविल्या जात असलेल्या व्यक्ती बदनामीच्या भीतीने फिर्याद देण्यास धजावत नाहीत. नगर शहर व जिल्हा संतांची भूमी आहे. या जिल्ह्याला सहकाराचा व पुरोगामी विचारांचा वारसा आहे. "हनी ट्रॅप'सारख्या प्रकरणांमुळे जिल्हा विनाकारण बदनाम होत आहे. यामधून जिल्ह्यात कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे या खंडणीबहाद्दर टोळ्यांचे रॅकेट उद्‌ध्वस्त करण्याची गरज असल्याचे जगताप यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. 

पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून संबंधितांचे उद्योग काय आहेत, त्यांचे उत्पन्नाचे मार्ग, त्यातून निर्माण झालेली संपत्ती, त्यांचे चारित्र्य व पूर्वेतिहास याची माहिती जमा करावी. त्यांच्या मोबाईलचे गेल्या दोन-तीन वर्षांतील कॉल डिटेल्स काढावेत. त्यात या प्रकरणाची पाळेमुळे दिसून येतील.

या टोळीचे कृत्य केवळ गुन्हेगारी स्वरूपात नव्हे, तर समाजविघातक स्वरूपात मोडणारे आहे. त्यापासून मोठे सामाजिक नुकसान होण्याची भीतीच नव्हे, तर खात्री आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांना तातडीने योग्य ते आदेश देणे गरजेचे आहे, असे जगताप यांनी सांगितले. 

झटपट श्रीमंतीसाठी काहीही करण्याची तयारी! 
या टोळीतील संशयितांच्या नावांचा विचार केला, तर त्यांचा कोणताही ठोस उद्योगधंदा नाही. उत्पन्नाचे चांगले मार्ग त्यांच्याकडे नाहीत. माहिती अधिकारात अर्ज करणे, त्यातून अधिकाऱ्यांना धमकावणे, "हनी ट्रॅप'सारखे उद्योग करून लाखोंची कमाई करणे, या बाबींवरच त्यांचा भर असतो. कमी श्रमात जास्त पैसा मिळवून झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग या टोळीतील सदस्य अवलंबत आहेत. त्यामुळे अशा टोळ्यांचा वेळीच बीमोड करायला हवा. "म्हातारी मेल्याचे दुःख नाही; परंतु काळ सोकावता कामा नये,' ही बाब पोलिस व प्रशासनाने ध्यानात घ्यायला हवी, असे जगताप म्हणाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT