Rahuri Mula Dam: मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे आज (रविवारी) दुपारी तीन वाजता कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी १० सेंटीमीटरने उघडण्यात आले. धरणातून मुळा नदीपात्रात चार हजार क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी जायकवाडी धरणासाठी झेपावले.
आज (रविवारी) सकाळी मुळा व जायकवाडी धरणाच्या अधिकाऱ्यांनी मुळा धरणाची पाणी पातळी तपासली. धरणात २२ हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. दुपारी बारा वाजता जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन होते. परंतु, निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविल्यावर मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे मुळा व जायकवाडीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरले.
जेणेकरून पाचेगाव बंधाऱ्याजवळ प्रवरा व मुळा नदीच्या संगमावर पाणी पातळी वाढून वेगाने जायकवाडीच्या दिशेने पाणी जाईल. परंतु, निळवंडेतून दुपारी १२ वाजता प्रवरेचा विसर्ग वाढविल्याने मुळा धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन बदलून दुपारी तीन वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.
यावेळी कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे, जायकवाडी धरणाचे उपअभियंता गोकुळे, कालवा निरीक्षक दिनकर लटपटे, बी. एम.टेकुळे, संदीप अंभोरे, एम.वाय.पुंड उपस्थित होते.(Latest Marathi News)
आज (रविवारी) रात्री नऊ वाजता पाण्याचा आढावा घेऊन नदीपात्रातील विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल. मुळा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्यपयोगी संसाधने सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करावीत. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता सायली पाटील व उपअभियंता विलास पाटील यांनी केले आहे.
मुळा धरणातून जायकवाडीसाठी २१०० दशलक्ष घनफूट पाणी दिले जात आहे. तीन-चार दिवस विसर्ग चालू राहील. नंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या परवानगीने मुळा नदीपात्रातील डिग्रस, मानोरी, वांजुळपोई, मांजरी बंधारे भरण्याचे नियोजन केले जाईल- सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.