mula dam water level rise due to rain monsoon weather forecast ahmednagar Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Mula Dam : मुळा धरण ५० टक्के २९ हजार ५३३ क्यूसेकने आवक

Ahmednagar water storage news in marathi |मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (ता.२५) पावसाचा जोर ओसरला. सकाळी सहा वाजता यंदाच्या हंगामातील विक्रमी २९ हजार ५३३ क्यूसेकने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होती.

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (ता.२५) पावसाचा जोर ओसरला. सकाळी सहा वाजता यंदाच्या हंगामातील विक्रमी २९ हजार ५३३ क्यूसेकने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळी सहा वाजता ९ हजार ५४१ क्यूसेकने झाली. सायकांळपर्यत धरण ५० टक्के भरले.

दोन ते तीन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगड ते कोतूळ मुसळधार पाऊस सुरू होता. गुरुवारी मागील २४ तासांत कोतूळ येथे ४७ मिलिमीटर, तर मुळा धरण येथे १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून धरणाच्या पाणलोटात मुळा नदीला पूर आला.

लहित खुर्द (कोतूळ) येथे बुधवारी सकाळी सहा वाजता मुळा नदीपात्रातून १० हजार ३४२ क्यूसेकने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होती. सकाळी दहा वाजता १६ हजार ७५० क्यूसेकने; दुपारी बारा वाजता २४ हजार ४५२ क्यूसेकने; सायंकाळी सहा वाजता २५ हजार ८२८ क्यूसेकने धरणात पाण्याची आवक वाढत राहिली.

गुरुवारी सकाळी सहा वाजता धरणसाठा ११ हजार ९१५ दशलक्ष घनफूट (४५.८२ टक्के) झाला, तर धरणात यंदाच्या हंगामातील विक्रमी २९ हजार ५३३ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू होती. आज सकाळी पाणलोटात पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक कमी होत गेली.

गुरुवारी सकाळी नऊ वाजता २० हजार ८२८ क्यूसेकने; तर सायंकाळी सहा वाजता ९ हजार ५४१ क्यूसेकने धरणात पाण्याची आवक सुरू होती. धरणात आज सकाळी सहा वाजता मागील २४ तासांत १२७९ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले, तर यंदाच्या हंगामात ५९९२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे.

धरण पूर्ण भरण्याची आशा

आज सायंकाळी सहा वाजता धरण साठा १३,००० दशलक्ष घनफूट झाला. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण निम्मे भरले. मागील वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. यंदाच्या वर्षी धरण भरण्याची आशा उंचावली आहे. मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, राहुरीचे उपविभागीय अधिकारी विलास पाटील, धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे धरणात जमा होणाऱ्या पाण्याकडे लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT