Fire Audit esakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : फायर ऑडिट न करणाऱ्या इमारत मालकांवर का होणार कारवाई

Nagar News :व्यावसायिक इमारती रडारवर फायर ऑडिटसाठी महानगरपालिकेच्या नोटिसा; कारवाईचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर :शहरातील मोठ्या व्यावसायिक इमारत मालकांनी फायर ऑडिटकडे पाठ फिरवली आहे. या इमारत मालकांना महापालिका नोटिसा बजाविणार आहे. फायर ऑडिट न करणाऱ्या इमारत मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

शहरात मोठ-मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. मॉल, हॉटेल्स, हॉस्पिटल, व्यापारी संकुल, शोरूम, तसेच अन्य व्यावसायिक इमारती उभ्या राहिल्या आहेत. शहरात आता १८ मजली उंच इमारती देखील उभ्या राहत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या इमारतींचे फायर ऑडिट होणे आवश्‍यक आहे. इमारत वापरात येण्यापूर्वी संबंधित मालकांनी इमारतीचे संपूर्ण फायर ऑडिट करून घेणे बंधनकारक आहे.

महापालिकेकडे अर्ज केल्यानंतर हे फायर ऑडिट होते. परंतु, शहरातील बहुतांशी इमारत मालकांनी या फायर ऑडिटकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या इमारतींसह त्यांच्या आजूबाजूच्या इमारतींचाही सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुधवारी (ता. २२) आपत्कालीन विभागाची बैठक घेत संबंधित इमारत मालकांना नोटिसा बजाविण्याचे आदेश दिले आहेत.

ज्यांनी फायर ऑडिट केलेले नाही, अशांना तत्काळ नोटिसा बजाविण्याची कार्यवाही करा, जे फायर ऑडिट करणार नाहीत, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार आपत्कालिन विभागाने नोटिसा बजाविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

हॉस्पिटलचे ऑडिट पूर्ण

शहरातील हॉस्पिटलच्या इमारतींचे फायर ऑडिट करण्यात आलेले आहे. काही हॉस्पिटल राहिले असून, त्यांचे ऑडिटची प्रक्रिया सुरू आहे. परंतु इतर व्यावसायिक इमारत मालकांनी फायर ऑडिट करून घेणे आवश्‍यक आहे. आग लागण्याची एखादी मोठी दुर्घटना घडली, तर संबंधित इमारत मालकच जबाबदार राहणार आहेत.

जीर्ण इमारतींकडे दुर्लक्ष

शहरात शंभराहून अधिक इमारती जीर्ण झाल्या असून, त्या कधीही कोसळण्याची भीती नगरकरांना आहे. महापालिका प्रशासनाचे या इमारतींकडेही दुर्लक्ष झालेले आहे. पावसाळा तोंडावर आहे. त्यात एखादी इमारत कोसळली, तर जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नगरकर उपस्थित करीत आहेत.

शहरात मोठ्या व्यावसायिक इमारतींचे संबंधितांनी फायर ऑडिट करून घेणे बंधनकारक आहे. परंतु बहुतांश इमारतींचे ऑडिट झालेले नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे संबंधितांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. ऑडिट न केल्यास संबंधितांवर कारवाई होईल.

- शंकर मिसाळ, प्रमुख, आपत्कालीन विभाग, मनपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT