nashik teacher constituency election vivek kolhe and rajendra vikhe candidates file nomination Sakal
अहिल्यानगर

Nashik Teacher Constituency : कोल्हेंपाठोपाठ आता विखे मैदानात

डॉ. राजेंद्र विखे पाटलांचे नाव नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चर्चेत होते.

सतीश वैजापूरकर

Shirdi News : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानात दोन दिवसांपूर्वी कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी उडी घेतली. त्यापाठोपाठ प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी आज ‘सकाळ’च्या प्रतिनिधीशी संपर्क साधून आपली उमेदवारी जाहीर केली.

ते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू आहेत. सध्या उत्तरेच्या राजकारणात विखे पाटील आणि कोल्हे परिवार या भाजपत असलेल्या शुगर लॉबीतील दिग्गज परिवारात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. आता या निवडणुकीच्या मैदानात देखील या संघर्षाचे प्रतिबिंब पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

डॉ. राजेंद्र विखे पाटलांचे नाव नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चर्चेत होते. त्यांच्या यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी देखील केली होती. भाजपकडून हिरवा झेंडा दाखवला की प्रचार सुरू, अशी स्थिती होती. त्यावेळचे आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. विखे पाटील यांच्यात लढत होईल, असे कयास बांधले जात होते.

मात्र नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर या दोघांची नावे मागे पडली. विद्यमान आमदार सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून या मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवले. त्यावेळी डॉ. विखे पाटील यांनी शांत राहाणे पसंत केले. तांबे यांना मदत करण्याची भूमिका घेतली.

आता नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी करण्याची तयारी डॉ. विखे पाटील यांनी सुरू केली. ते प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक आणि गेल्या पंचवीस वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य आहेत. दहा वर्षांपासून या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य आहेत. नगर व नाशिक जिल्ह्यांतील विविध शैक्षणिक संस्थांसोबत त्यांना संपर्क आहे.

दराडे यांचीही निवडणुकीची तयारी

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत युवानेते विवेक कोल्हे व डाॅ.राजेंद्र विखे पाटील हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येवल्याचे आमदार किशोर दराडे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत.

त्यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही संस्थाचालक देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. असे असले तरी यातील दिग्गज नेत्यांचे रिमोट कंट्रोल ज्‍या त्‍या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चितीच्यावेळी यातील कुणाकुणाला इच्छा असूनही माघार घेण्याची वेळ येईल हे पहावे लागेल.

आपण नाशिक शिक्षण मतदारसंघातून उमेदवारी करावी, असा आग्रह माझ्या सहकाऱ्यांकडून सुरू आहे. मतदार नोंदणीस यापूर्वीच सुरवात केली आहे. माझी उमेदवारी निश्चित आहे, असे म्हटले तरी चालेल. मी तयारी सुरू केली आहे.

- डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलपती, प्रवरा वैद्यकीय अभिमत विद्यापीठ, लोणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT