sharad pawar sakal
अहिल्यानगर

Sharad Pawar: शेतकरी त्यांच्या मागणीसाठी संघर्ष करीत असताना सुद्धा सरकार त्यांना न्याय देण्यात अयशस्वीच..!

He was speaking at a farmers' meeting held at Akole market: दूध, कांद्याला रास्त भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी.

सकाळ वृत्तसेवा

Akole, City: ‘‘देश आज आर्थिक संकटातून जात आहे. काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. दुधाला भाव नाही. शेतकऱ्यांची मागणी जास्त नाही. उत्पादन खर्चा एवढा भाव मागत आहेत. दुधाला रास्त भाव मिळावा, यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही वेगळी स्थिती नाही. त्यांचीही कांद्याला रास्त भाव मिळावा, ही अपेक्षा असते. मात्र, त्या कांदा उत्पादकांनाही न्याय देण्याचे काम या सरकारला करता आले नाही,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

स्व. अशोकराव भांगरे यांच्या ६१ व्या जयंतीनिमित्त अकोले बाजारतळावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत होते. या वेळी खासदार नीलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, एकवीरा फाउंडेशनच्या जयश्री बाळासाहेब थोरात, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते सत्यशिल शेरकर, युवा नेते अमित भांगरे, अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनीता भांगरे, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

ते म्हणाले, की राज्यातील आदिवासी बहुल असलेला अकोले तालुका आहे. एकेकाळी दुष्काळी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला पाणी देण्याची भूमिका घेणारा तालुका आहे. लोकांच्या हिताची जपणूक करणाऱ्या या तालुक्यात अनेक थोर नेते होऊन गेले. त्यात यशवंतराव भांगरे यांची प्रकर्षाने आठवण होते. मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो, त्यावेळी सभागृहात आदिवासींचे प्रश्न मांडणारे यशवंतराव भांगरे होते. त्यानंतरच्या काळात अशोकराव भांगरेंनी त्यांच्या विचारांची नवीन पिढी तयार करुन त्यांच्याकडून अकोलेतील गोरगरीब कष्टकरी जनेतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. जनतेसाठी आयुष्य झोकून देवून काम करणारा अजातशत्रू अशोकराव भांगरे होते. तुम्ही लोकांनीही त्यांचा शब्द पाळला.

या वेळी किसानसभेचे अशोक ढवळे यांनी देशात १९९० व २००८ मध्ये शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना दोनदाच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आताचे सरकार फक्त उद्योजक व मोठ्या लोकांचीच कर्जमाफी करत असल्याची टीका केली. याप्रसंगी अमित भांगरे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सुनिता भांगरे, चंदू घुले, महेश नवले, डॉ. अजित नवले, बी. जे. देशमुख आदींची भाषणे झाली. स्वागत तालुकाध्यक्ष सुरेश गडाख यांनी, तर प्रास्तविक विनोद हांडे यांनी केले.

आघाडीचे खासदार शेतकऱ्यांची बाजू मांडतील

महाविकास आघाडीचे ३१ खासदार संसदेत शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न मांडतील, याची मी तुम्हाला खात्री देतो. नाशिक येथे कांदा प्रश्नावर शेतकऱ्याने देशाच्या पंतप्रधानांना जाब विचारला, तर त्यास पोलिसांनी अटक केली. शेतकऱ्याने आपली भूमिका मांडावी का नाही, असे वातावरण सध्या देशात आहे. जगाचा अभ्यास सांगण्यापेक्षा शेतकरी आणि शेती मालाच्या किमतीकडे लक्ष असू द्या, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारला दिला.

आमदार डॉ. लहामटे यांच्यावर टीका

२०१९ वाटले होते, की ज्यांना आम्ही उमेदवारी दिली, तो माणूस साधा आहे. शब्दाला किंमत देईल. लोकांची व माझी साथ सोडणार नाही, पण मुंबईला जाऊन ज्यांनी आपली भूमिका बदलली, त्यांना अकोले तालुक्याच्या तरुणाच्या ताकदीवर बाजूला करण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. आमदार डॉ. किरण लहामटे यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला.

'माझ्या अमितवर लक्ष ठेवा'..!

एका कार्यक्रमात अशोकराव मला अस्वस्थ दिसले. त्यावेळी त्यांना अस्वस्थतेबद्दल विचारले असता, त्यांनी ‘मला काही मागायचे नाही. फक्त एक काम करा. माझ्या मुलावर, अमितवर लक्ष ठेवा,’ ही विनंती जाहीर कार्यक्रमात केली, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT