ncp news rahul jagtap with sharad pawar balasaheb Nahata support to ajit pawar babasaheb bhos maharashtra politics ahmednagar Sakal
अहिल्यानगर

Maharashtra Politics : राहुल जगताप पवार साहेबांसोबत; नाहाटांची दादांना साथ, भोस यांची भूमिका गुलदस्तात

राज्यात राजकीय भूकंप घडविणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी राहील, अशी चर्चा

संजय काटे

श्रीगोंदे : राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप हे कोणासोबत जातात, याबाबतची श्रीगोंद्यातील उत्सुकता संपली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याजवळ असणारे जगताप यांनी ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.

त्याच वेळी राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी मात्र ते दादांसोबत असल्याचे सांगत श्रीगोंद्यात दुफळी असल्याचे समोर आणले. ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी मात्र अजून भूमिका जाहीर केली नाही.

राज्यात राजकीय भूकंप घडविणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी राहील, अशी चर्चा होती. तथापि, ती फोल ठरली. विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार राहुल जगताप यांनी ते साहेबांसोबत असल्याचे स्पष्ट केले.

मी साहेबांसोबत, अशा ओळींचे छायाचित्रही सोशल मीडियावर टाकले. त्यांच्याशी संपर्क साधला असता आपण शरद पवार यांच्याच सोबत असल्याचे सांगत चर्चेवर पडदा टाकला. भाजपचे आमदार बबनराव पाचपुते व राहुल जगताप हे दोघे राजकीय स्पर्धक आहेत.

आता भाजप व अजित पवार एकत्र असल्याने विधानसभेला दोघांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार हे स्पष्टच होते. त्यामुळे जगताप यांना दादांसोबत जाण्यात धोका होता. शिवाय, सकाळी पवार व त्यांच्या जवळच्या नेत्यांनी जगताप यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असल्याचे समजते.

भविष्यातील सेफ राजकीय गेम जगताप खेळले असल्याचे या निर्णयावरून दिसते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, बाळासाहेब नाहाटा यांनी मात्र ते अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.

राज्य बाजार समिती महासंघाचे सभापतिपद त्यांच्यामुळेच आपणाला मिळाले असून, आपण त्यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्याशी संपर्क साधला असता, आपण याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यात मते जाणून घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले.

दादांसोबत, पण पाचपुते यांचा विरोधकच ः नाहाटा

आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असलो म्हणजे तालुक्यात आमदार बबनराव पाचपुते यांच्यासोबत आहे, असे नाही. त्यांचा पक्ष व आमचा काही संबंध नाही. त्यांना आपला विरोध कायमच राहील.

आगामी विधानसभेला जर राष्ट्रवादीने राहुल जगताप यांना उमेदवारी दिली, तर मी त्यांचाच प्रचार करीन. २०१४ मध्ये आपण रासपचे प्रदेशाध्यक्ष होतो तरीही जगताप यांच्यासाठी थेट व्यासपीठावर आलो होतो. याही वेळी तसेच होईल, असे नाहाटा यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT