ncp shrigonda esakal
अहिल्यानगर

श्रीगोंद्यात राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी! विखे गटाची साथ

संजय काटे

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : तालुक्यात अनेक वर्षे एकत्र असणारी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आता दुंभगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली असून, संभाव्य उमेदवारांना ‘कामाला लागा’ असा छुपा आदेशही दिल्याची माहिती आहे. काँग्रेसला बाजूला ठेवून विखे पाटील यांना मानणारे नेते, कार्यकर्त्यांची साथ घेण्याची खेळी खेळली जात आहे. या प्रक्रियेत माजी आमदार राहुल जगताप यांच्या हाती सूत्रे, असून स्वबळावर लढण्याच्या तयारीच्या वृत्ताला त्यांनीही दुजोरा दिला आहे. (NCP-self-strenth-in-Shrigonda-political-news-jpd93)

श्रीगोंद्यात राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढले. मात्र येथे शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी करीत राहुल जगताप यांना आमदार करण्यात वाटा उचलला. त्यावेळी प्रा. तुकाराम दरेकर यांनी या आघाडीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर बहुतेक निवडणुकांत ही आघाडी एकत्रित लढली. भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा डाव यशस्वी झाला होता. त्यानंतरच्या जिल्हा परिषद निवडणुकांतही दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी तीन जागा वाटून घेतल्या होत्या. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने घनशाम शेलार यांना उमेदवारी दिली. त्यावेळी राजेंद्र नागवडे यांनी भाजपत प्रवेश करीत तालुक्यातील काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावले. आता काँग्रेसची सूत्रे अनुराधा नागवडे यांच्या हाती आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीत घेणार विखे गटाच्या स्थानिक नेत्यांची साथ

दरम्यान, राष्ट्रवादीचे जगताप यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. यापूर्वी नागवडे यांच्यापुढे जगताप हे नमते घेत होते. आता मात्र त्यांनी नागवडे गटाला बाजूला ठेवत स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेसला बाजूला ठेवून आता राष्ट्रवादी विखे पाटील गटाला मानणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांची सोबत घेणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, व बाळासाहेब गिरमकर यांची साथ घेऊन ते या निवडणुकात लढणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू केली असून, संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा, असे आदेशही दिल्याचे समजते.

‘राष्ट्रवादी’चे संभाव्य उमेदवार

काष्टी- बंडू जगताप, वैभव पाचपुते, बाळासाहेब गिरमकर

आढळगाव- बाळासाहेब गिरमकर, हरिदास शिर्के

मांडवगण- सचिन जगताप

कोळगाव- डाॅ. प्रणोती जगताप, हेमंत नलगे (संपर्कातील एक भाजप एक नेता)

येळपणे- कल्याणी लोखंडे

बेलवंडी- अण्णासाहेब शेलार

जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. तयारी सुरू असून, विरोधी पक्षातील अनेक नेतेही संपर्कात आहेत. आरक्षण कसे पडेल, याचा अंदाज घेऊन उमेदवार ठरवित आहोत. -राहुल जगताप, माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT