nevasa school initiative election school com samarth shinde education sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : शाळेतही बनले शिंदेच मुख्यमंत्री; ‘कौन बनेगा मुख्यमंत्री',नेवासे जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

कौन बनेगा मुख्यमंत्री; नेवासे खुर्द जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक राहुल आठरे यांच्या संकल्पनेतून

विनायक दरंदले

नेवासे : शालेय विद्यार्थ्यांत राजकारणाबाबत निर्माण झालेली उत्सुकता आणि चिमुकल्यांना लोकशाहीचा अर्थ समजून मतदान हक्काचे प्रबोधन व्हावे, याकरिता शाळेच्या वर्गात निवडणूक प्रक्रिया, मतमोजणी व शपथविधीचा उपक्रम नेवासे खुर्द जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आला. ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ निवडणुकीत ‘शिंदे’नी बाजी मारली. इयत्ता दुसरीतील समर्थ शिंदे हा शाळेतील मुख्यमंत्री बनला.

नेवासे खुर्द जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक राहुल आठरे यांच्या संकल्पनेतून इयत्ता दुसरीच्या वर्गात हा आगळा उपक्रम राबविण्यात आला आहे. वर्गात तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्राचे उद्‌घाटन नायब तहसीलदार किशोर सानप यांच्या हस्ते झाले.

मुख्याध्यापिका पुष्पा ठुबे, विषयतज्ज्ञ समी शेख, पालक प्रतिनिधी अशोक डौले आदी उपस्थित होते. शिक्षक आठरे यांनी शालेय वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम अधिसूचना, उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी, चिन्हवाटप, प्रचार, मतदान, मतमोजणी व मंत्रिमंडळ शपथविधी कार्यक्रम राबविला.

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी निवडणूक कर्मचारी व पोलिस कर्मचारी म्हणून भूमिका साकारली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुष्पा ठुबे, साईनाथ वडते होते. त्यांना शिक्षक अरविंद घोडके, अण्णासाहेब शिंदे, प्रतिभा पालकर, छाया वाघमोडे, प्रतिमा राठोड, विद्या खामकर, मीनाक्षी लोळगे, ज्योती गाडेकर, अश्विनी मोरे, प्रतिभा गाडेकर आदींनी साहाय्य केले.

  • वर्ग मंत्रिमंडळ

  • मुख्यमंत्री - समर्थ शिंदे

  • उपमुख्यमंत्री - आरिश बागवान

विविध खात्यांचे मंत्री- सोफियान पटेल, कैवल्य आरले, ज्ञाना जगताप, संचित ठोळे, श्रेयस रेनिवाल, रोहित गवळी, आदित्य कोतकर

शालेय निवडणूक प्रक्रिया कार्यक्रमास उपस्थित पालक व ग्रामस्थांना मतदानाचा हक्क बजावण्यात यावा, याविषयी प्रबोधन करण्यात आले. प्रचार, निवडणूक, मतमोजणी आणि विजयी मिरवणुकीचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.

- राहुल आठरे, शिक्षक, संयोजक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT