आमदार नीलेश लंके ई सकाळ
अहिल्यानगर

कोरोनाची लाट ओसरताच पारनेरसाठी आणले पाच कोटी

मार्तंड बुचुडे

पारनेर : कोरोनामुळे विकास कामांच्या निधीला मोठी कात्री लागली होती. मात्र, कोरोनाचे संकट कमी होऊ लागले आहे. त्याचाच फायद घेत आमदार नीलेश लंके यांनी पारनेर-नगर मतदारसंघात विविध विकास कामांसाठी पाच कोटी १५ लाखांचा निधी मंजूर करून आणला.

आमदार लंके यांच्या प्रयत्नातून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत युपीएससी व एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी निघोज येथे एक कोटी खर्च करून अभ्यासिका मंजूर केली. निघोजच्या मळगंगा मंदिराजवळ या अभ्यासिकेची इमारत होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा फायदा होणार आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक होतकरूंना या परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळत नाही ही अडचण विचारात घेत लंके यांनी अभ्यासिकेसाठी निधी मंजूर केला आहे. (Nilesh Lanke brought a fund of five crore rupees for Parner taluka)

मंजूर केलेला निधी असा : वाळवणे गावठाण ते शिवरस्ता २० लाख, पिंपळनेर प्रयत्न शिक्षण संस्था शाळा खोली १० लाख, विरोलीतील गणपती चौफुला सामाजिक सभागृह ५० लाख, आपधूप पांडूरंग मंदीर सभामंडप १५ लाख, वाडेगव्हाण गावांतर्गत रस्ता १५ लाख, टाकळी ढोकेश्‍वर गावांतर्गत रस्ता २० लाख, सोबलेवाडीतील शाळा संरक्षक भिंत १५ लाख, वडगावदर्या गावठाण ते गव्हाळी रस्ता १० लाख, काताळवेढे दत्तमंदीर रस्ता २०, जवळा भावनीमाता रस्ता २० लाख, काकणेवाडी श्रीराम मंदीर सभामंडप १० लाख, वाघुंडे दिवटे मळा ते वाघुंडे नदीवरील पुल ४० लाख, गोरेगाव ते ब्राम्हणदरा रस्ता व पुल २० लाख, गुणौरे स्मशानभुमी १० लाख, वडझिरे, बाभुळवाडे, अक्कलवाडी, ठाकरवाडी रस्ता घाट अपघात प्रवण भागाची सुधारणा व दुरूस्ती ३० लाख.

निंबळक माळवाडी रस्ता १५ लाख, खंडाळा, नगर-दौंड आरणगाव शिवरस्ता २० लाख, खडकी तुळजभवानी मंदीर सभामंडप १० लाख, बाबुर्डीबेंद गावठाण ते खंडोबा मंदीर रस्ता १५ लाख, जनसुविधांतर्गत कामरगाव व देहरे येथे ग्रामपंचायत कार्यालयास प्रत्येकी १५ लाख.

विरोलीला ६५ लाखांचा निधी

विरोली सारख्या छोट्या गावातील पिंपळेश्वर मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी १५ लाख व गणपती चौफुला येथे सभामंडपासाठी ५० लाख असा ६५ लाखांचा निधी दिला आहे. या गावाला प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेचा निधी मिळाल्याने ग्रामस्थांनी लंके यांचे आभार मानत दिवाळीच साजरी केली. ((Nilesh Lanke brought a fund of five crore rupees for Parner taluka))

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT