लंके कोविड सेंटर ई सकाळ
अहिल्यानगर

लंकेंच्या कोविड सेंटरला जमली कोटीची मदत! कोकणचा हापूस, मावळातून तांदूळ

मार्तंड बुचुडे

पारनेर ः राज्यातच नव्हे तर देशात अन जगातही कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या रूग्णांना दिलासा देण्यासाठी पारनेरचे आमदार नीलेश लंके (mla nilesh lanke) यांनी भाळवणी येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार (sharad pawar) कोविड सेंटरसाठी जगभरातून मदत येत आहे. रोख रक्कम तसेच वस्तूही दान म्हणून येत आहेत. कोकणातून हापूस आंबे व मावळातून तांदूळ आला आहे. एकंदरीत लंके मोफत कोविड सेंटर चालवित असल्याने संपूर्ण जगभरातील दानशूर मदतीसाठी सरसावले आहेत. (One crore rupees assistance to Nilesh Lanke's covid Center)

भाळवणी येथे उभारलेल्या कोविड सेंटरसाठी आमदार लंके दिवस-रात्र झटत आहेत. तेथेच त्यांचा मुक्काम असतो. १४ एप्रिल रोजी सुरू केलेल्या एक हजार शंभर बेडच्या या कोविड सेंटरमधून आतापर्यंत सुमारे अडीच हजारावर रूग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

कोविड सेंटरच्या उदघाटनाच्या पहिल्या दिवशीच सरकारी-अधिकारी व कर्मचा-यांनी मिळून २० लाखांची देणगी जाहीर केली होती. दुसऱ्या दिवशीपासून तालुक्यासह जिह्यातूनही मदतीचा ओघ सुरू आहे. औषधे, भाजीपाला, फळे, धान्य तर कोणी रूग्णांसाठी अंडी, सुकामेवा देऊन आपले सामाजिक दायित्व व लंकेंप्रती असलेले प्रेम व्यक्त करीत आहेत.

त्यांच्या या कामावर परदेशातील नागरिकही बेहद खूष आहेत. कोकणातून हापूस आंबे आले आहेत. मावळातील लोकांनी तांदूळ दिला आहे. या भेटीच्या मोबदल्यात कोकणवासीयांनी आमदार लंके यांना आमच्या कोकणात यावे लागेल, अशी गळ घातली आहे. एक दिवस मुक्काम करून आदरातिथ्य करण्याची संधी मिळावी, असे कोकणकर म्हणतात.

लंके पॉझिटिव्ह नेतृत्त्व

पॉझिटिव्ह विचारांचे नेतृत्व असले की जनतेतला कोरोनातून सहज निगेटिव्ह करता येतो. सत्ता संपत्ती व शस्त्र चंचल आहे. त्याचा योग्य वेळी योग्य कारणासाठी वापर करण्याचे शहाणपण ज्या नेतृत्वाला समजले त्यांचीच इतिहासाने नोंद घेतली आहे.

- गणेश शिंदे, व्याख्याते.

(One crore rupees assistance to Nilesh Lanke's covid Center)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT