organ donation sakal
अहिल्यानगर

Organ Donation : अपघातात मुलाचा ब्रेन डेड झाल्याने; वडिलांनी केलेल्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान

Parner News : दुःखाचा डोंगर तरीही पारनेर तालुक्यातील कुटुंबाचे प्रेरणादायी पाऊल आयुष्यभर विसरता येण्यासारखे नाही

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : एकुलता एक मुलगा अपघातात गेला. आई-वडिलांना त्याचे दुःख आयुष्यभर विसरता येण्यासारखे नाही, तरीही अपघाताने मुलाचा ब्रेन डेड झाल्याने वडिलांनी सामाजिक विचार करून त्याच्या किडनी, हृदय आणि फुप्फुसाचे दान केले.

‘यातून चार जणांचा जीव वाचविण्याचे समाधान मिळाल्याचे’ वडील संजय बबन नाईक सांगतात. पारनेर तालुक्यातील रूईछत्रपती येथील संजय नाईक यांचा मुलगा महेश (वय २०) याचा नगर ते वाळकी रस्त्यावर वाळकीनजीक अपघात झाला.

या अपघातात महेश गंभीर जखमी झाला. त्यास प्रथम नगर येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, येथे उपचार होणार नाहीत, असे सांगितल्यावर त्यास पुढील उपचारासाठी पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

तेथील डॉक्टरांनी महेशच्या मेंदूस मार लागल्याने ब्रेन डेड झाला आहे. त्यामुळे तो आता वाचणार नाही, असे सांगितले. एकुलता एक मुलगा अन् तोही आता आपणास सोडून जात आहे, याचे मोठे दुःख वडील संजय व आई आशाबाई यांना झाले.

मात्र, त्याचवेळी त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये मुलाच्या अवयवदानाची संकल्पना सांगितली. वडील संजय हे मुंबई येथे शिक्षक आहेत. त्यांना पूर्वीपासून समाजसेवेची आवड आहे. या भावनेतून त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून अवयवदानाचा निर्णय घेतला.

माझा मुलगा, तर वाचणार नाही, मग किमान त्याचे अवयव दान करून इतरांना जीवदान मिळत असले, तर ते आपण का करू नये, असा विचार मनात आला आणि त्यांनी अवयव दानाचा निर्णय घेतला.

चौघांना जीवनदान

संजय नाईक यांनी महेशचे हृदय, फुफ्फुस तसेच दोन्ही किडनी दान केल्या. चारही अवयवांचे लगेचच इतर रुग्णावर रोपण करून चार जणांना जीवदान देण्याचे काम केले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.

एकुलता एक मुलगा गेला, हे दुःख आयुष्यभर विसरता येणार नाही. मात्र, त्याच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान मिळाले. याचे समाधन कधीही न विसरता येण्यासारखे आहे. माझा मुलगा केवळ मेंदूसारख्या मानवी अवयवामुळे आम्हाला सोडून गेला, अशी वेळ कुणावरही येऊ नये.

अद्याप तरी विज्ञानाने मानवी अवयव तयार करण्याचे ज्ञान मिळविले नाही. त्यामुळे माझ्यातील माणूस जागा झाला व मी मुलाचे अवयव दान करण्यास राजी झालो.

- संजय नाईक, वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT