अहिल्यानगर

Police Patil Bharti: ४७६ गावांना मिळणार पोलीस पाटील ! 'या' ५ तालुक्यांत दहा वर्षांनंतर होणार भरती

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, नेवासे, शेवगाव, नगर, पाथर्डी आणि अकोले तालुक्यांत

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Police Patil Bharti: आरक्षणातील संभ्रम, कोरोना. आचारसंहिता अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया गेल्या दहा वर्षांपासून रखडली होती. राज्य शासनाने पोलीस पाटील भरतीस परवानगी दिल्याने जिल्ह्यातील

सहा तालुक्यांतील ४७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी गुरुवारी (ता. ७) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. अकोले, संगमनेर, नगर, नेवासे, पाथर्डी आणि शेवगाव या तालुक्यांचा त्यात समावेश आहे.

कोपर्डी (ता. कर्जत) येथे एका अत्याचार अल्पवयीन मुलीवर करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सकल मराठा समाजाने राज्यभर भव्य मोर्चे काढले होते. कोपर्डी अत्याचार खटला जलदगती न्यायालयात चालवावा, मराठा समाजाला आरक्षण द्यावे आदी मागण्या होत्या. या मोर्चानंतर प्रमुख मागण्य राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

त्यामुळे पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये कोणत्या समाजाला आरक्षण द्यायचे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस पाटील पदाची भरती रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले. कोरोना संसर्ग आजाराची साथ २०१९ मध्ये आली. सर्वत्र लॉकडॉऊन करावे लागले. त्यानंतर पुन्हा दुसरी कोरोनाची साथ

आली. या दोन्ही साथी नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय पातळीवरील भरती, बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अशा विविध कारणांनी पोलिस पाटील भरती प्रक्रिया रखडली होती. (Latest Marathi News)

प्रशासन- जनतेचा समन्वय

■ पोलीस पाटील हे पद गावात प्रतिष्ठेचे पद म्हणून ओळखले जाते. पोलीस आणि महसूल प्रशासनासाठी महत्त्वाचा समन्वय असतो. गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देणे, गुन्ह्यांच्या तपासात मदत करणे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची जबाबदारी असते. गावात साथीचे आजार आल्यास त्याची माहिती महसूल प्रशासनाला देणे आदी कर्तव्य त्यांचे असतात.

येथे निघणार सोडत

■ संगमनेर उपविभागातील संगमनेर व अकोले तालुक्यांतील १५१ गावांतील पदांकरिता संगमनेर शहरातील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह, नवीन नगर रोड, संगमनेर या ठिकाणी सभेचे सकाळी ११ वाजता आयोजन केलेले आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. नगर व नेवासे तालुक्यांतील १२९ गावांतील पदांकरिता नियोजन भवन, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर या ठिकाणी दुपारी ३ वाजता सभेचे आयोजन केलेले आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.

■ पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील १९६ गावांतील पदांकरिता सकाळी ११ वाजता पाथर्डी तहसील कार्यालयात काढली जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी दिली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT