Police took action against a salesman harassing citizens on road at Shanishinganapur  Sakal
अहिल्यानगर

शनिशिंगणापुरातून ‘लटकू’ हद्दपार; पोलिसांची धडक मोहीम

विनायक दरंदले

सोनई (जि. अहमदनगर) : शनिशिंगणापुरात अनेक वर्षापासून सुरू असलेला ‘लटकूं’चा त्रास अखेर पोलिसांच्या मोहिमेमुळे हटला. पोलिसांनी मनावर घेतल्याने गाव आता ‘लटकू’मुक्त झाले आहे. या मोहिमेचे ग्रामस्थ व भाविकांकडून स्वागत होत आहे.


गावात व्यावसायिक स्पर्धा म्हणून दोनशेहून अधिक ‘लटकू’ पूजासाहित्य विक्रीसाठी रस्त्यावर असतात. वाहनांचा पाठलाग करून भाविकांना ठरावीक दुकानात घेऊन जाणे व गावात रस्ता अडवून पूजासाहित्य घेण्यासाठी दादागिरी होत होती. गावाची प्रतिमा मलिन होत असलेला हा प्रकार बंद होण्यासाठी यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी यापूर्वी प्रयत्न केले होते. देवस्थानचे सुरक्षारक्षक व पोलिसांना न घाबरता ‘लटकू’ कार्यरत होते.


गावातील मुख्य रस्त्यावर दोन ‘लटकूं’नी शुक्रवारी (ता. १७) सहायक फौजदार बाळू मंडलिक यांना मारहाण केल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल यांनी ‘लटकू हटाव’साठी विशेष पथक तयार करून धुलाई सुरू करताच रस्त्यावरील सर्व ‘लटकू’ एका दिवसात हद्दपार झाले. ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवल्याने भाविकांच्या त्रासाची साडेसाती हटली आहे.

भाविकांची अडवणूक होऊ नये, याकरिता सर्व वाहनतळ मालक व व्यावसायिकांना सक्त सूचना दिली आहे. पूजेचे ताट सर्वसाधारणपणे शंभर रुपयांना आहे. दिशाभूल व सक्ती होत असल्याने पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन करणारे फलक लावणार आहे. यापुढे रस्त्यावर ‘लटकू’ दिसणार नाहीत.
- सचिन बागूल, सहायक पोलिस निरीक्षक

शनी ग्रहदेवता असल्याने व्यावसायिक व ‘लटकू’ साडेसातीची भीती दाखवून फसवणूक करतात. बळजबरी व दादागिरीचा प्रकार अनेकदा अनुभवला आहे. रस्त्यावर पोलिस थांबल्याने आज कुठलाच त्रास झाला नाही.
- अक्षय उपाध्याय, इंदूर (मध्य प्रदेश)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT