Power of NCP Minister Tanpure in Wambori Gram Panchayat 
अहिल्यानगर

आरक्षणाची गंमत ः वांबोरीची सत्ता राष्ट्रवादीचे मंत्री तनपुरेंकडे, सरपंच भाजपच्या सुभाष पाटलांचा

विलास कुलकर्णी

राहुरी : तालुक्यातील 82 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे सन 2020-25 या पाच वर्षासाठी आरक्षण आज जाहीर झाले. वांबोरी ग्रामपंचायतीत नुकतेच सत्तांतर झाले. परंतु, बहुमत असूनही आरक्षणाचा सदस्य विरोधी असल्याने, "गड आला पण सिंह गेला" अशी सत्ताधाऱ्यांची परिस्थिती झाली आहे. 

आज राहुरी येथे पालिकेच्या केशररंग मंगल कार्यालयात तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आरक्षणाची सोडत काढली. नायब तहसीलदार गणेश तळेकर, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे उपस्थित होते.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढतांना सन 1995 पासून मागील पाच पंचवार्षिकमध्ये पडलेले आरक्षण विचारात घेण्यात आले.

मागील पंचवीस वर्षात अनुसूचित जाती, जमाती व प्रवर्गाचे आरक्षण झालेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात आले. त्यात, 2011 च्या जनगणनेनुसार जातीनिहाय लोकसंख्येची उतरत्या क्रमाने टक्केवारीनुसार आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नंतर स्त्री व पुरुष आरक्षण चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले. 

उंबरे, धानोरे, मल्हारवाडी येथे झालेल्या आरक्षणाचा एकही सदस्य नसल्याने, तेथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीची अद्याप निवडणूक झालेली नाही. त्यामुळे, तेथील सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढली नाही.

या ग्रामपंचायतीत मंत्री प्राजक्त तनपुरे यांना मानणाऱ्या बाबासाहेब भिटे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने सत्ता मिळवली. परंतु जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते अॅड. सुभाष पाटील यांच्या गटाचा सरपंच होणार आहे.

"उंबरे, धानोरे, मल्हारवाडी येथे आरक्षणानुसार सदस्य नाही. तेथे, सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर रिक्त पदाचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाईल. तेथे जिल्हाधिकारी यांना आरक्षणात बदल करण्याचा अधिकार आहे.

- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी."

 

ग्रामपंचायत निहाय आरक्षण असे :
अनुसूचित जाती (पुरुष) : ताहाराबाद, कुक्कडवेढे, वांबोरी, चेडगाव, केंदळ खुर्द. (महिला) : मांजरी, मल्हारवाडी, मुसळवाडी, वळण, खुडसरगांव, चिंचाळे.
अनुसूचित जमाती (पुरुष) : वरशिंदे-वाबळेवाडी, रामपूर, कात्रड, केंदळ बुद्रुक, खडांबे खुर्द. (महिला) : मालुंजे खुर्द, शिलेगाव, धानोरे, ब्राम्हणगाव भांड, उंबरे.

नागरीकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) : तुळापूर, पिंपळगाव फुणगी, आंबी, चांदेगाव, चिंचविहिरे, कणगर बुद्रुक, वावरथ, जांभळी-जांभुळबन, पिंप्री वळण, करजगाव, गणेगाव. (महिला) : सोनगाव, सडे, धामोरी खुर्द, वडनेर, मोमीन आखाडा, चिखलठाण, दरडगाव थडी, टाकळीमिया-मोरवाडी, बाभुळगाव, कानडगाव, डिग्रस.

सर्वसाधारण (पुरुष) : सात्रळ, निंभेरे, तांदुळनेर, तांभेरे, कोळेवाडी, घोरपडवाडी, बारागाव नांदूर, कोंढवड, तांदुळवाडी, वरवंडी, खडांबे बुद्रुक, गुंजाळे, संक्रापूर, दवणगाव, केसापूर, बोधेगाव, लाख, पाथरे खुर्द, कोपरे, तिळापुर. (महिला) : गुहा, कुरणवाडी, म्हैसगाव, राहुरी खुर्द, मानोरी, देसवंडी, तमनर आखाडा, पिंप्री अवघड, ब्राह्मणी, मोकळ ओहोळ, धामोरी बुद्रुक, चिंचोली, गंगापूर, अंमळनेर, जातप, माहेगाव, वांजुळपोई, कोल्हार खुर्द, आरडगाव. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT