कोरोना प्रादुर्भावामुळे गेले वर्षभर शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. 2019-2020चे निकाल उशिरा जाहीर झाले. त्यामुळे 2020-21ची प्रवेशप्रक्रियाही उशिरा सुरू झाली.
नगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्या सत्राची ऑनलाइन परीक्षा संपण्यापूर्वीच दुसऱ्या सत्राची परीक्षा 15 जूनपासून घेण्याचे जाहीर केले. त्यादृष्टीने 15 मेपासून परीक्षा अर्ज भरून घेण्यास प्रारंभही केला आहे. "लॉकडाउन'मुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम शिकवून होण्यापूर्वीच परीक्षा जाहीर झाल्याने, विद्यार्थी व शिक्षकांचा पुरता गोंधळ उडाला आहे. (Pune University announces second term schedule)
कोरोना प्रादुर्भावामुळे गेले वर्षभर शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. 2019-2020चे निकाल उशिरा जाहीर झाले. त्यामुळे 2020-21ची प्रवेशप्रक्रियाही उशिरा सुरू झाली. पदव्युत्तर वर्गांचे अध्यापन गेल्या जानेवारीत सुरू झाले, तर पदवीचे प्रवेश तोपर्यंत सुरूच होते. त्यानंतर या वर्गांचे अध्यापन ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. प्रात्यक्षिकेदेखील ऑनलाइन पद्धतीने घ्यावी लागत आहेत. प्रथम सत्राच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा एप्रिल व मेमध्ये होत आहेत. 25 मे रोजी त्या संपणार आहेत. यातच विद्यापीठाने द्वितीय सत्राचे परीक्षा फॉर्म भरण्यास 15 मेपासून प्रारंभ केला आहे, तर परीक्षा 15 जूनपासून घेण्याचे जाहीर केले.
"लॉकडाउन'मुळे पुस्तक दुकाने व महाविद्यालयांची ग्रंथालयेही बंद आहेत. अनेकांचा रोजगार बंद आहे. महाविद्यालयांत ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. त्यांना ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची साधने उपलब्ध होतील असेही नाही. त्यामुळे परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरणे सर्वच विद्यार्थ्यांना शक्य नाही. द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास कमी वेळ उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे द्वितीय सत्राच्या अंतर्गत परीक्षा कधी घेणार वा त्या परीक्षांचे गुणांकन कधी होणार, याबाबतही प्राध्यापकांत चिंतेचे वातावरण आहे.
फॉर्म भरायचा कसा?
निकाल नसल्याने परीक्षा फॉर्ममध्ये कोणते गुण भरायचे, सध्या सुरू असलेल्या परीक्षेत बॅकलॉग राहिलेले विषय परीक्षा फॉर्ममध्ये कसे भरणार? महाविद्यालये बंद आहेत. अशात परीक्षा फॉर्म भरायचा कसा, अशी अडचण निर्माण झाली आहे.
"लॉकडाउन'मुळे नेट कॅफे बंद आहेत. अनेक पालकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे परीक्षा शुल्क भरण्यास आर्थिक अडचण आहे. याचा विचार करून विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात.
- प्रा. डॉ. के. एल. गिरमकर, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटना
(Pune University announces second term schedule)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.