ahmednagar esakal
अहिल्यानगर

अहमदनगरमधून तिसरी लाट? कडक कारवाई करण्याचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) गेल्या दोन दिवसापासून अहमदनगर (ahmednagar) जिल्हयाच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव (coronavirus) रोखण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या संगमनेर आणि पारनेर तालुक्याचा दौरा केला असून अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडला असल्याचं स्पष्ट केलंय. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होईना. अनेक दिवसांपासून सातत्याने जिल्ह्यात मोठ्या संख्येने बाधित सापडणारा पारनेर तालुका ठरत आहे. (मंगळवार ता.२१) तालुक्यात ११४ कोरोना रुग्ण आढळून आले. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील कोरोना आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व उपसंचालक पुना गांडाळ यांनी तालुका दौरा केला.

कडक कारवाई करण्याचे आदेश

जिल्ह्यातील अनेक भागात दशक्रिया, लग्न सोहळे मोठया प्रमाणात तर रस्त्यांवर मोठी गर्दी होत असून नागरिकांनी दक्षता न घेतल्यास अहमदनगर जिल्ह्यातून कोरोनाची तिसरी लाट सुरू होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे. तसेच नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश गमेंनी प्रशासनाला दिले असल्याची माहिती दिली. कोरोना रुग्ण संख्या शून्यावर आणण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर भर द्या. लसीकरणाचा वेग वाढवा. कोरोना रुग्ण शोध मोहिमेवर भर द्या, अशा सूचना नाशिक विभागीय आयक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी व प्रशासनाला दिल्या. आयुक्त गमे यांनी निमोण येथील कोरोना रुग्ण संख्या, त्यांच्यावर कुठे उपचार सुरु आहेत. नेमके कुठे रुग्ण आढळले? ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट सुरु आहे का ? यासहीत उपाययोजनांचा आढावा घेतला. रुग्ण संख्या शून्यावर आणण्यासाठी कोरोना रुग्ण शोधमोहीमेवर भर द्यावा तसेच लसीकरणाचा वेग वाढवावा. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा. कोरोना रुग्ण संख्या शून्यावर आणण्यासाठी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकारी व प्रशासनाला दिल्या.

यावेळी त्यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालय, टाकळी ढोकेश्वर व कान्हूर पठार प्राथमिक आरोग्य केंद्रांस भेट देऊन पहाणी करून विविध सूचनाही केल्या. पारनेर ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण, औषधसाठा, आॅक्सिजन प्लँट तसेच नवीन ५० बेडच्या विभागाची पाहणी केली. तसेच तेथील रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी टाकळी ढोकेश्‍वर व कान्हूर पठार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही भेट देऊन आढावा घेतला. या वेळी आयुक्त गमे व उपसंचालक डॉ. गांडाळ यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्यांनी तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांना गर्दीवर नियंत्रण ठेवा. वेळ प्रसंगी बाजार बंद करा, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करा. नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांना सील करा, असे आदेश दिले. त्यांच्या समावेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा आरोग्याधिकारी संदीप सांगळे, तहसीलदार गणेश आढारी, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप, तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश लाळगे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT