अहिल्यानगर

Radhakrushn Vikhe: शेतकऱ्यांच्या खात्यांवर ६३७ कोटी जमा! पीक नुकसानीपोटी साडेसहा लाख शेतकऱ्यांना मदत, विखेंची माहिती

जिल्‍ह्यात २०२२-२०२३ मध्ये झालेली अतिवृष्‍टी, सततचा पाऊस, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्‍या पिकांच्‍या नुकसानीपोटी सहा लाख ५६ हजार ९५९ शेतकऱ्यांना सुमारे ६३७ कोटी ७८ लाख रुपयांचे मंजूर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

Manoj Bhalerao

Radhakrushn Vikhe on Farmers: जिल्‍ह्यात २०२२-२०२३ मध्ये झालेली अतिवृष्‍टी, सततचा पाऊस, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्‍या पिकांच्‍या नुकसानीपोटी सहा लाख ५६ हजार ९५९ शेतकऱ्यांना सुमारे ६३७ कोटी ७८ लाख रुपयांचे मंजूर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

ते म्हणाले की, सप्‍टेंबर, ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये झालेल्‍या अतिवृष्‍टीत सुमारे दोन लाख ५५ हजार ६८ शेतकऱ्यांच्‍या पिकांचे नुकसान झाले होते. त्यापोटी २९१ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले. याच दरम्‍यान अतिवृष्‍टीच्‍या निकषाबाहेरील सततच्‍या पावसामुळे पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीची भरपाई म्‍हणून दोन लाख ९२ हजार ७५० शेतऱ्यांना विशेष बाब म्‍हणून २४१ कोटी रुपयांची मदत देण्यात आली.

मार्च २०२३ मध्‍ये अवेळी पावसामुळे जिल्‍ह्यात ११ हजार ७९३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दहा कोटी ४१ लाख ४७ हजार ५८३ शेतकऱ्यांना एप्रिल २०२३ मध्‍ये झालेल्‍या अवकाळी पावसाच्‍या नुकसानीची मदत म्‍हणून ४६ कोटी ९३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्‍यात आली आहे. (Latest Marathi News)

ऑक्‍टोबर, नोव्‍हेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत शेती पिकांच्‍या नुकसानीची भरपाई देखील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिली असून, जिल्‍ह्यातील २७ हजार ५३० शेतकऱ्यांना १९ कोटी ५५ लाख रुपयांची मदत देण्‍यात आल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

नोव्‍हेंबर २०२३ मध्‍ये झालेल्‍या वादळी वारे आणि गारपिटीतील पिकांच्‍या नुकसानीकरिता २१ हजार ६८३ शेतकऱ्यांना २८ कोटी ३७ लाख, जून २०२३ मध्‍ये वादळी वारे व गारपिटीमुळे झालेल्‍या नुकसानीसाठी ४६० शेतकऱ्यांना ४५ लाख आणि सप्‍टेंबर २०२३ मध्‍ये अतिवृष्‍टी व पुरामुळे पिके व शेतजमिनीच्‍या नुकसानीपोटी ९२ शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली असल्‍याकडे लक्ष वेधून, आतापर्यंत नैसर्गिक नुकसान झालेल्‍या शेतकऱ्यांच्‍या पाठीशी महायुती सरकार भक्‍कमपणे उभे असून, जिल्‍ह्याला आतापर्यंत ६३७ कोटी ७८ लाख रुपयांची मदत देण्यात आली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT