Karjat 
अहिल्यानगर

'तुम्ही काम काय केलं ते सांगा', राम शिंदेंचे रोहित पवारांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

कर्जत (जि. अहमदनगर) : मी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. मात्र, त्यात राजकारण आणलं नाही. तुम्ही गेल्या दोन वर्षांत काय कामे केली ते सांगा. पदाधिकारी- कार्यकर्त्यांनो, आजपासून तयारीला लागा. आपली विकासकामे जनतेपर्यंत पोचवा. कुठल्याही आमिषाला, भूलथापांना बळी न पडता भाजप मित्रपक्षांच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी केले.

निवडणुकीत दडपशाही होत असल्याचा आरोप करीत शिंदे यांनी संत गोदड महाराज मंदिराच्या पायरीवर मौनव्रत आंदोलन केले. आज दुपारी या प्रकारचा निषेध करीत भाजपच्या वतीने शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. हा मोर्चा अक्काबाईनगर येथे आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा बँक संचालक अंबादास पिसाळ, सहनिरीक्षक बाळासाहेब महाडीक, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, दादासाहेब सोनमाळी, रवी सुरवसे, अजय काशीद, सोमनाथ पाचारणे, काका धांडे, गणेश क्षीरसागर यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

ते म्हणाले, की ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराचा आशीर्वाद घेत त्यांना इमानदारीला मतदान करायला सांगा. त्यांची रोज उठून दमबाजी सुरू आहे. मात्र, लोकांच्या हे लक्षात आले आहे. कर्जतकरांना माहिती आहे, आम्ही काय विकास केला ते.
पिसाळ म्हणाले, की येथे आमदार रोहित पवार यांनी दडपशाही करून, दबाव आणून उमेदवारांना माघारी घेण्यास सांगितले. मागील वेळी आम्ही विरोधात असतानाही राम शिंदे यांनी कधीच असे केले नाही.

सोनमाळी, मुंडे, महाडीक, भालसिंग, अजय काशीद, गावडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन पोटरे यांनी केले, तर आभार अनिल गदादे यांनी मानले.

जे गेले, ते परत येतील. येथे उभे राहण्याची संधी होती. निकाल काही लागू देत. मात्र, तेथे पत्ता कट झाला. निवडणूक काळात जे आरोप झाले, त्यांपैकी एकही आरोप सिद्ध झाला नाही. त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, असा टोला शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला. प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही त्यांनी टीकास्त्र सोडले.

समोर आले, पण बोलले नाही

मौनव्रत आंदोलन करीत राम शिंदे व कार्यकर्त्यांनी संत गोदड महाराज मंदिराच्या पायरीवर रात्र जागून काढली. आज सकाळी राम शिंदे आणि आमदार पवार संत गोदड महाराज मंदिरासमोर एकमेकांसमोर आले. मात्र, एकमेकांकडे न पाहता, शब्दही बोलले नाही. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT