Ram Shinde criticizes Rohit Pawar 
अहिल्यानगर

Video : कुकडीच्या आवर्तनाबाबत फसवाफसवी - राम शिंदेंचा रोहित पवारांवर आरोप 

सकाळ वृत्तसेवा

कर्जत ः कर्जत-जामखेडसह करमाळा तालुक्‍यासाठी कुकडीचे पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. सहा तारीख जाहीर केली, खरी परंतु धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. असे असताना आम्ही उपोषणाचा इशारा दिल्याने त्यांनी घाईने आवर्तन सोडण्याचा निर्णय जाहीर केला. तोही फसवा आहे, त्यासाठी उपोषण करावे लागत आहे, असा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी जाहीर केला.

कुकडीच्या पाण्यासाठी त्यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आमदार रोहित पवार यांनी कुकडीच्या पाण्याचे नियोजन केलं होतं. तसे त्यांनी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलंही होतं. उन्हाळ्यातील आवर्तन 15 मे रोजी येईल, असे सांगितले असताना त्याला पंधरवडा उलटून गेला. मात्र, तरीही त्यांना पाणी सोडता आलं नाही. 

आमदार पवार यांच्यावर विश्‍वास ठेवून शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली. परंतु या बागा आता पाण्यावाचून जळून चालल्या आहेत. त्यांना दिलेला शब्द पाळता आलेला नाही.ते अनेकदा जनतेशी फेसबुकवरून संवाद साधत असतात. परंतु पाण्याबाबत ते काहीच बोलत नाहीत. पाणी सोडण्याबाबत आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला. तेव्हा कुठे घाईघाईने यंत्रणा हलली. आणि सहा जून ही तारीख जाहीर केली. वास्तविक पाहता सहा तारखेला पाणी सोडता येणार नाही. कारण येडगाव धरणात तेवढा पुरेसा साठाच नाही. त्यामुळे ही केवळ बनवाबनवी आहे, असेही माजी मंत्री राम शिंदे म्हणाले. 

अधिकाऱ्यांना पाण्याबाबत उत्तरे देता येत नाही. ते लेखी आश्‍वासन देण्याची भाषा करीत आहेत. परंतु जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील, असेही शिंदे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, तालुकाध्यक्ष डॉ. मनोज गावडे, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT