balasaheb-thorat Google
अहिल्यानगर

ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करणारा सहकार जपायला हवा : थोरात

सकाळ डिजिटल टीम


संगमनेर (जि. नगर) : सहकाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्याच्या विकासात जिल्हा बँकेचे मोठे योगदान आहे. यावेळी बँकेची निवडणूक पक्ष विरहीत व सर्वांना सोबत घेत बिनविरोध केली. आपल्या सर्वांच्या प्रगतीची व्य़वस्था असलेली सहकार चळवळ निकोपपणे जपण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तालुक्यातील 100 टक्के वसुली देणाऱ्या 16 सेवा संस्था व 35 बँक शाखांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे उपाध्यक्ष अँड. माधवराव कानवडे होते.


ते म्हणाले, दिवंगत नेते यशवंतराव चव्हाणांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी राज्यात सहकार चळवळ रुजवली. जिल्ह्यातील जुन्या पिढीतील नेत्यांनी ती जीवापाड जपत जिल्ह्याचा विकास साधला. जिल्हा सहकारी बँक आर्थिक कामधेनू आहे. शासन व सहकाराच्या माध्यमातून आज मोठी प्रगती झाली आहे. बँकेने शेतकऱ्यांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा लौकिक कायम जपला आहे. महाविकास आघाडी सरकारने सहज व सोप्या पद्धतीने दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केल्याने, जिल्हा बँकेला चौदाशे कोटींची कर्जमाफी मिळाली. कोरोना संकटामुळे दोन लाखांपेक्षा अधिकची कर्जमाफी देता आली नसली तरी ती नक्की दिली जाणार आहे. जिल्हा बँक आर्थिक शिस्त, काटकसर व पारदर्शकतेतून सुरू आहे. सर्वांच्या भल्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात. तालुक्याने कर्ज भरण्याची परंपरा व नैतिकता जपल्यामुळे यावर्षी एकाही सोसायटीमध्ये अनिष्ट तफावत राहिली नसल्याची माहीती अँड. माधवराव कानवडे यांनी दिली.


या वेळी 2020- 21 या आर्थिक वर्षात 100 टक्के वसूली देणाऱ्या जोर्वे, देवकौठे, वरझडी, निंबाळे, घुलेवाडी, कुंभारवाडी, शिरसगाव धुपे, सांगवी, आनंदवाडी, वरुडी पठार, कौटेवाडी, म्हसवंडी, आंबी दुमाला, बोटा, चिखली, निमगाव भोजापूर या सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा व जिल्हा बँकेच्या 35 शाखाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संचालक गणपतराव सांगळे, प्रशांत गायकवाड, रामदास वाघ, आर. बी. राहाणे, रामहरी कातोरे, लक्ष्मण कुटे, अजय फटांगरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, उपनिबंधक गणेश पुरी, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT