अहिल्यानगर

आंदोलनानंतरही वाळूतस्करी सुरुच! प्रवरापात्रातून गाढवांद्वारे वाळूवाहतूक

आनंद गायकवाड

संगमनेरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी गंगामाई घाटावरील नदीपात्रात मोठे आंदोलन केले होते. मात्र, याचा कोणताही परिणाम वाळूचोरांवर झाला नसल्याची बाब उघड झाली आहे.

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्यातील मुळा, प्रवरा, म्हाळुंगी नद्यांमधील अनिर्बंध वाळूउपशामुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या अवैध व्यवसायात अनेकांचे हात गुंतल्याने, त्यांच्या पाठीवर असलेल्या राजकीय व प्रशासकीय वरदहस्तामुळे ठोस कारवाई होत नाही, असा आरोप करीत, बुधवारी (ता. १६) संगमनेरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी गंगामाई घाटावरील नदीपात्रात मोठे आंदोलन केले होते. मात्र, याचा कोणताही परिणाम वाळूचोरांवर झाला नसल्याची बाब उघड झाली आहे. बुधवारी सायंकाळी, तसेच आजही भर दिवसा नदीपात्रातून गाढवांच्या मदतीने वाळूचोरी सुरूच होती. (sand has been stolen from the pravara river in sangamner)

गेल्या काही वर्षांपासून वाळूतस्करांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरलेल्या मुळा व प्रवरा नदीपात्रांतील वाळूला तालुक्यात, तसेच मुंबई, पुणे, नाशिक परिसरातील बांधकामांसाठी मोठी मागणी आहे. तालुक्यात कुठेही वाळूचा शासकीय लिलाव झाला नसल्याने, विविध मार्गांनी तालुक्याच्या पठार भागातील मुळा, तसेच प्रवरा, म्हाळुंगी नदीपात्रांतून मोठ्या प्रमाणात वाळूचोरी होते. यामुळे नदीपात्रांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाल्याने, परिसरातील विहिरींची पाणीपातळी घटणे, पाण्याचे स्रोत आटणे यांसह पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तालुक्यातील नागरिकांनी विविध स्तरांवर वाळूतस्करीला विरोध करूनही, प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याने सुरू असलेली वाळूचोरी कायम चर्चेत राहिली आहे.

मंगळवारी खांडगावच्या ग्रामस्थांनी वाळूतस्करांविरोधात यल्गार पुकारला होता. तसेच, दुसऱ्या दिवशी संगमनेरातील पर्यावरणप्रेमीही वाळूतस्करीविरोधात एकवटले. गौण खनिजाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या महसूल खात्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यक्षेत्रातील ही अंधाधुंदी संपविण्यासाठी प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती.

प्रशासनाला वाळूचोर जुमेनात

आंदोलनानंतरही बुधवारी सायंकाळी रिक्षातून वाळूच्या गोण्या वाहणारे काही युवक व गुरुवारी दुपारी १६ गाढवांद्वारे खुलेआम वाळूवाहतूक सुरू असल्याचे बघायला मिळाल्याने, मुजोर वाळूचोर प्रशासनालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. (sand has been stolen from the pravara river in sangamner)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT