कर्जत (अहमदनगर) : राज्य शासनाने दिलेल्या परवानगीनुसार पाडव्यापासून येथील संत सद्गुरू गोदड महाराज समाधी मंदिर सह सर्वधर्मीय धार्मिक स्थळं दर्शनासाठी खुली झाली आहेत.
या वेळी भाविकांबरोबर आमदार रोहित पवार, नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, संतोष म्हेत्रे, सचिन सोंनमाळीच्यासह मान्यवरांनी महाआरती मध्ये सहभाग नोंदविला. यावेळी मंदिराचे पुजारी, मानकरी, विश्वस्त, पालखी दिंडी सोहळ्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे गर्दी आणि त्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून राज्य शासनाच्या वतीने राज्यातील सर्व मंदिर व सर्वधर्मीय प्रार्थनास्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दरवाजा बंद जरी असला तरी देवस्थानचे सर्व नियमित दैनंदिन धार्मिक विधी सुरूच होते. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व मंदिरे व सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली.
त्यानुसार तालुक्यातील संत सदगुरु गोदड महाराज समाधी मंदिर, अष्टविनायकपैकी एक क्षेत्र सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिर, राशीन येथील जगदंबा माता मंदिर, मांदळी येथील आत्माराम गिरी महाराज, टाकळी येथील स्थपलिंग मंदिर, शेगुड येथील खंडोबा मंदिर सह सर्व धर्मीय प्रार्थनास्थळ उघडण्यात आली. यावेळी भाविक ग्रामस्थांच्यावतीने महाआरती करण्यात आली. तालुक्यातील संत गोदड महाराज, राशीन येथील जगदंबा माता व सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरातील महाआरतीस आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.
आमदार रोहित पवार म्हणाले, माझ्यासह इतरांनीही सरकारला विनंती केली होती. त्यानुसार सर्व भाविक-भक्तांसाठी आणि व्यावसायिकांसाठी दिवाळी पडव्यानिमित्त आनंदाचा दिवस उगवला. यानिमित्त माझ्या मतदारसंघातील धार्मिक स्थळी जाऊन मीही दर्शन घेतलं. कर्जतचं ग्रामदैवत असलेल्या सद्गुरु संत श्री. गोदड महाराज, राशीनची जगदंबा देवी आणि सिद्धटेकच्या गणरायाची भाविक आणि कार्यकर्त्यांसह मनोभावे पूजा-आरती करुन कोरोनासारख्या संकटाचं निवारण करण्याचं साकडं घातलं. धार्मिक स्थळं उघडल्याने या परिसरातील व्यवसायांनाही चालना मिळेल. पण कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकडं कुणीही दुर्लक्ष करु नये. कोरोनाला रोखणं हे आपल्याच हाती आहे. त्यासाठी मास्कचा वापर, गर्दी टाळणं, हे नियम सर्वांनीच कटाक्षाने पाळावेत, ही विनंती.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.