गावातील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करणार असल्याची माहिती सरपंच डॉ. धनंजय पोटे यांनी "सकाळ"शी बोलताना दिली.
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : कोरोनाची (corona) दुसरी लाट ओसरत असतानाच तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने राळेगणसिद्धी (ralegansiddhi) येथील ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करणार असल्याची माहिती सरपंच डॉ. धनंजय पोटे यांनी "सकाळ"शी बोलताना दिली. (sarpanch dr. dhananjay Pote by informed that all citizens will be tested for corona in ralegansiddhi)
यावेळी ते म्हणाले की, पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये काही जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. मात्र ते संकट गावावर परत येऊ नये, यासाठी आम्ही गावातील सर्व जण एकत्र येत या संकटाला गावाच्या वेशीबाहेरच ठेवणार आहे. त्यासाठी गावातील सर्व नागरिकांची चाचणी करून घेणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या मदतीने प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन चाचणी करणार आहे. तसेच प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणार असल्याची माहिती डॉ. पोटे यांनी दिली.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत राळेगणसिद्धी गावाने आरटीपीसीआरच्या एकूण ५० जणांची तर १०० जणांची अँटीजेन रॅपिड चाचणी केली. इतर गावांनी देखील अशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे, असे डॉ. अपूर्वा वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी सरपंच मंगल मापारी, ग्रामपंचायत सदस्य मंगल उगले, सुनिल हजारे उपस्थित होते. तसेच डॉ. अपूर्वा वाघमारे, आरोग्य सहाय्यक रमाकांत जगताप, आशा कर्मचारी मंगल मापारी, सुनिता सोनवणे, स्वाती गडकर यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली.
सध्या गावातील सर्व कामे ही शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सुरू आहेत. गावातील दुकाने व इतर आस्थापना ह्या दररोज चार वाजता बंद केल्या जात आहेत. यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचीही आरोग्य विभागाच्या मदतीने आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
- सरपंच डॉ. धनंजय पोटे, राळेगणसिद्धी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.