school building dangerous Astagaon parents complain education department Sakal
अहमदनगर

Ahmednagar News : धोकादायक इमारतीत भरते शाळा; अस्तगाव येथील प्रकार, पालकांचा जीव टांगणीला

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : तालुक्यातील अस्तगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक झालेली आहे. अशा स्थितीतही येथे वर्ग भरविले जात असल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात असून, मुले घरी येईपर्यंत प्रत्येक पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.

अस्तगाव हे गाव पारनेर-नगर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले गाव आहे. येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतचे शाळा असून य शाळेत सध्या १३२ मुले शिक्षण घेत आहेत. सातवीपर्यंत शिक्षण असल्याने शाळेत मुलेही आनंदी आहेत.

मात्र, येथे फक्त दोनच वर्ग खोल्या सुस्थितीत आहेत. इतर पाच वर्ग खोल्या जुन्या झालेल्या आहेत. या वर्ग खोल्यांच्या भिंतींची पडझड झाली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर या वर्ग खोल्यांच्या भिंतीतून वर्गात पाणी येत आहे. त्यामुळे या शाळेसाठी तातडीने किमान पाच वर्ग मंजूर करून बांधकाम पूर्ण करून घ्यावे, असे पालकांमधून बोलले जात आहे.

मुलांना ७ किलोमीटरपर्यंत जवळची शाळा नाही. मुले शिकावीत अशी प्रत्येक पालकांची इच्छा आहे. मात्र, शाळा खोल्यांची झालेली दुरवस्था पाहून पावसाळ्यात भिंती कोसळतील की काय अशी भीती वाटते.

- लता वाबळे, सरपंच

अनेकदा पंचायत समितीत शिक्षण विभाग, तसेच गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन शाळेच्या झालेल्या दुरवस्थेबाबत माहिती दिली आहे. मात्र, अद्यापही नवीन खोल्या मिळाल्या नाहीत.

- राजू गाढवे, उपाध्यक्ष, व्यवस्थापन समिती

आम्ही पाच खोल्यांचा निर्लेखनाचा प्रस्ताव चार महिन्यांपूर्वीच पाठविला आहे. अद्याप निर्लेखनास मंजुरी आली नाही. वर्ग खोल्यांची दुरवस्था झाली आहे. भिंतीची पडझड झाली आहे. पाऊस सुरू झाल्यावर पत्र्यामधून पाणीगळती होते. त्यामुळे तातडीने वर्ग खोल्या मिळणे गरजेचे आहे.

- विमल जाधव, मुख्याध्यापक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सकारात्मक विचारसरणीचे फायदे

‘आहारही काटेकोर हवा’

उज्जैनच्या Mahakal Temple ची भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती

हॅरी पॉटर फेम आणि ऑस्कर विजेत्या अभिनेत्री Maggie Smith यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण! संस्थेच्या विश्वस्तांसह प्राचार्यांवर आमदार धंगेकरांचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT