Pravara River SDRF Boat Accident esakal
अहिल्यानगर

जीव वाचवण्यासाठी आलेली SDRF ची बोट उलटली! नगरच्या प्रवरा नदीत तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरु

Pravara River SDRF Boat Accident : काल प्रवरा नदीत दोन तरुण बुडाले होते. एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा होता शोध सुरू होता.

Sandip Kapde

Pravara River SDRF Boat Accident :

उजनी धरणातील बोट दुर्घटना ताजी असताना आता अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीत एसडीआरफची बोट उलटली आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. एका बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एसडीआरफ पथकाची बोट उलटली. या बोट दुर्घटनेत ५ जण बुडाले. तिघांचा मृत्यू झाला  तर दोघांचा शोध सुरु आहे.  


पथकातील चार जणांसह एक स्थानिक बोटीत बुडाला. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळची ही घटना आहे. यामध्ये  SDRF पथकातील तिघांचा मृत्यू झाला. 

काल प्रवरा नदीत दोन तरुण बुडाले होते. एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा होता शोध सुरू होता. दरम्यान शोध कार्यासाठी आज SDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र बोट उलटल्याने SDRF पथकातील तिघांचा मृत्यू झाला. 

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले असून इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी ही माहिती दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT