drowned esakal
अहिल्यानगर

स्वातंत्र्यदिनी पर्यटन बेतले जीवावर; ४ पैकी एकाचा शोध सुरू

विलास कुलकर्णी

राहुरी (जि. अहमदनगर) : शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणारे चार जण स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुळा धरणावर गेले. पण हाच आनंद फार काळ टिकला नाही. कारण ३ मित्रांनी आपल्या एका मित्राला गमावले आहे.

घटनेची माहिती अशी -

रविवारी (ता.१५) ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यदिनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मुळा धरणावर मोठी गर्दी केली. त्यात, राहुरी शहरातील वैशाली हॉटेलमध्ये काम करणारे चार जण धरणाच्या चमेली अतिथीगृहाच्या जवळ बसले. पैकी, बिरेंदरसिंग रावत (रा. उत्तराखंड) व रावसाहेब भिमराज मते (वय ४०, रा. मुलनमाथा, राहुरी) दुपारी एक वाजता अतिथीगृहाच्या मागील बाजूने धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. परंतु अथांग खोल पाण्यात दमछाक झाल्याने त्यांनी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली. धरणात मासेमारी करणारे विकास गंगे व इंद्रजीत गंगे मदतीला धावले. त्यांनी रावतला बुडतांना वाचविले. तोपर्यंत मते पाण्यात गायब झाले होते. काठावर उभे राहुन दुर्घटना पाहणार्‍या त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी घाबरुन धूम ठोकली. घटनास्थळी शेकडो पर्यटक बघ्यांची गर्दी जमली. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना घटनेची माहिती समजताच दुपारी तीन वाजता पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, कॉन्स्टेबल अण्णासाहेब चव्हाण, संजय शिंदे घटनास्थळी दाखल झाले.

अथांग पाण्यात गायब

यापैकी, दोन जण थेट धरणाच्या पाण्यात पोहायला उतरले. परंतु, खोल पाण्यात दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. धरणात मासेमारी करणाऱ्या तरुणांनी एकाला वाचविले. दुसरा मात्र अथांग पाण्यात गायब झाला. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बिरेंदरसिंग रावत (रा. उत्तराखंड) असे धरणात बुडतांना वाचविलेल्या व्यक्तीचे नाव आहे.‌ रावसाहेब भिमराज मते (वय ४०, रा. मुलनमाथा, राहुरी) असे गायब असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या अंगावरील कपडे व चपला धरणाच्या काठावर ठेवलेले आढळले.

...त्यामुळे घडतात दुर्घटना

धरणात मासेमारी करणारे लहू बर्डे, अशोक गायकवाड, किशोर बर्डे, विकास गंगे, इंद्रजीत गंगे, चंदू बर्डे, शक्तीलाल गंगे, करण सूर्यवंशी यांच्या मदतीने होडीतून व ट्यूबच्या साहाय्याने पाण्यात गळ टाकून शोध घेण्यात आला. अंधार पडल्यावर शोधमोहीम थांबविण्यात आली. सोमवारी (ता.१७) सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. मुळा धरणाच्या चमेली अतिथीगृहाकडे पर्यटक जाऊ नयेत. यासाठी खंदक करून, वृक्षारोपण करण्यात आले. परंतु, पर्यटकांनी खंदक बुजवून पुन्हा रस्ता केला. तेथे फलक लावून, पर्यटकांनी पाण्यात उतरु नये. यासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. तरी, पर्यटक दुर्लक्ष करुन, जीवाची बाजी लावतात. त्यामुळे दुर्घटना घडतात. - अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण शाखाधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT