सोनई : शनिभक्त व्यंकटेश राव यांच्या खर्चातून व शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या शनिचौथरा नूतनीकरण कामाच्या वाढीव पायाचे काम पूर्ण झाले आहे. ६१ लाख रुपये खर्चाच्या घडीव दगडातील कामाची उत्सुकता भाविक व ग्रामस्थांना लागली आहे. एक महिना काम सुरू असताना चौथऱ्यावरील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
शनिशिंगणापूर येथे अंदाजे साडेचारशे वर्षापूर्वी स्वयंभू शनिमूर्तीची स्थापना करण्यात आल्यानंतर आहे त्या चौथ-यास दोन वेळेस फरशी व इतर काम करण्यात आलेले आहे. येथील देवता चौथ-यावर विराजमान असल्याने येथे कुठलेही मंदिर नाही.
यामुळे येथील चौथरा आकर्षक असावा, अशी संकल्पना वेंकीज ग्रुपचे कार्यकारी संचालक व्यंकटेश राव यांनी विश्वस्त मंडळास सांगितल्यानंतर गोवा राज्यातील स्थापत्य अभियंता अभिजित साधले यांनी दिलेल्या डिझाईननुसार प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यात आली आहे.
पूर्वीपासून १८ बाय १८ आकारात असलेला चौथरा आता २१ बाय २१ आकारात सजला जाणार आहे. १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हुबळी ( कर्नाटक ) येथून घडीव दगड शनिशिंगणापूर येथे दाखल झाले असून तेथील कारागिरांनी नाजूक कोरीव काम येथे पूर्ण केले आहे.
शनिदर्शन सुरु ठेवून पावणेदोन फूट रुंद व सहा फूट खोलीचा पाया व काँक्रिटचे काम झाले आहे. सध्या चौथ-यावरील दर्शन पूर्व बाजूने सुरु आहे. जुन्या पाकशाळेसमोर ठेवण्यात आलेले आकर्षक घडीव दगड पाहता नवीन चौथ-याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुस-या टप्प्यातील काम एक महिना चालणार असल्याने याकाळात चौथ-यावरील दर्शन बंद ठेऊन सर्वांसाठी पादुका व मूर्तीचे दर्शन समोरुन करता येणार आहे.
-जी.के.दरंदले, कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान ट्रस्ट
घडीव दगड - १६
दगडी काॅर्नर - ४
रेड आग्रा फरशी - २०
सिंह याली - ४
ब्रास कास्टिंग - ६२ फूट
गोमूख - १
एकूण पायऱ्या - १०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.