अहिल्यानगर

Shevgaon: दुष्काळाची झळ, दूध दराची कळ ! दुधाचे दर घसरल्याने संकट, जनावरं विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

दुष्काळी परिस्थितीशी झगडत चारा आणि पाणीटंचाईशी सामना करणाऱ्या तालुक्यातील दूध उत्पादकांना घसरलेल्या दराचा मोठा फटका बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shevgaon Milk Rate Dropped: दुष्काळी परिस्थितीशी झगडत चारा आणि पाणीटंचाईशी सामना करणाऱ्या तालुक्यातील दूध उत्पादकांना घसरलेल्या दराचा मोठा फटका बसला आहे. पशुखाद्य व चारा यांचे भाव गगनाला भिडलेले असताना त्या तुलनेत दूधाला दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लिटरमागे जवळपास ७ ते ८ रुपयांची अचानक झालेली घट ५५ ते ६० हजार लिटर संकलन असलेल्या या दुष्काळी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारी आहे.

सहकारी व खासगी दूध उत्पादक संस्थांचे जाळे गावोगावी पसरलेले आहे. एकेकाळी दूध उत्पादक तालुका अशी ओळख असलेल्या शेवगाव तालुक्यात सध्या दूध चळवळ अखेरच्या घटका मोजत आहे. एकेकाळी ६० हजार लिटरवर असलेले तालुका दूध संघाचे संकलन आता अवघ्या १३ हजार लिटरवर आले आहे. ते देखील खासगी संस्थेमार्फत केले जात आहे. राजकारण व व्यवस्थापनाने सहकारी संस्था मोडकळीस आल्या.

व्यापारी तत्त्वावर उभ्या राहिलेल्या खासगी संस्था शेतकऱ्यांची सर्रास लूट करत आहेत. त्यातील बहुतांश राजकीय नेत्यांच्याच असल्याने त्यावर शासनाचा देखील अंकुश नाही. त्यातच दुष्काळी परिस्थितीचा सामना करत सातत्याने दूध उत्पादक शेतकरी पशुखाद्याचे वाढलेले दर, चारा पाण्याची टंचाई याला तोंड देत असल्याने हळुहळू दूध उत्पादन घटू लागले आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने व दुभती जनावरे सांभाळणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने कर्जबाजीरपणामुळे खेड्यापाड्यात जनावरांच्या दावणी रिकाम्या दिसू लागल्या आहेत.(Latest Marathi News)

पशुखाद्यांचे व इतर बाबींचे दर सातत्याने वाढत आहेत. त्या दरात गेल्या काही दिवसात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. दुधाच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे या व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची वाट धरलेल्या बेरोजगार तरुणांना जनावरांसाठी घेतलेले कर्ज फेडणे देखील कठीण झाले आहे. (Latest Marathi News)

दुष्काळी परिस्थितीत शेतीला आधार देणारा जोडधंदा म्हणून अनेक तरुण शेतकरी दूध व्यवसायाकडे वळाले आहेत. जनावरांची खरेदी, गोठा बांधणी व इतर गोष्टींसाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. शासनाच्या अनास्थेमुळे दुधाला नेहमीच उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. इतर पशुखाद्य चारा व इतर सर्वच गोष्टींचे भाव सातत्याने वाढत असताना दुधाचे भाव मात्र कमी होत आहे.- कृष्णा ढोरकुले, अध्यक्ष, साई व्यंकटेश दूध संस्था, शेवगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

Warora Assembly Election Result 2024 : वरोरामध्ये गुलाल भाजपचाच! करण देवतळे 65170 मतांनी विजयी

Kalyan Rural Election Result 2024 : कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांचा 66 हजार 396 मतांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT